१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:49 PM2021-04-30T17:49:31+5:302021-04-30T18:09:34+5:30
Corona Death : बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल निधनानंतर पॉझिटिव्ह आला.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारात कर्नाटकमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे 32 वर्षीय व्यक्तीची तब्येत ढासळली. त्यानंतर कुटुंबियांनी त्याची कोरोना तपासणी करुन घेतली. दहा दिवसांत दोनदा त्याची तपासणी झाली, परंतु कोरोना दोन्ही वेळा कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल निधनानंतर पॉझिटिव्ह आला.
गुरुवारी या तरूणाचे लग्न होते. लग्नाच्या एक दिवस आधीच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. चिक्कमंगलूरू येथे राहणारा पृथ्वीराज डी.एम याचे 29 एप्रिल रोजी लग्न पार पडणार होते. घरात लग्नाची तयारी चालू होती. तो लग्नासाठी दोन आठवड्यांपूर्वी आपलं घर देवकोडोडी येथे बंगळुरुहून परतला होता.
नवरा मुलगा बेंगलुरूमध्ये सेल्स एग्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील मंजूनाथ हे शेतकरी आहेत. पृथ्वीराज हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. बेंगलुरूवरून आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होतं, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण चाचणी निगेटिव्ह आली आणि मुलाला बरं वाटू लागल्यामुळे ठरलेल्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....
दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती. अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यावेळी घरातल्या लोकांनी लगेचच रुग्णालयात भरती केलं. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही लक्षणांमध्ये तीव्रतेनं वाढ झाली होती. अखेर पृथ्वीराजला शिवमोगा येथील मॅकगॅन रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल केले आणि व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. मात्र तरीही प्रकृती सुधारली नाही अखेर बुधवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.
पत्नीचे दागिने विकून रिक्षाला एम्बुलेंस बनवलं; गोरगरिब रुग्णांना रिक्षा चालकाचा मदतीचा हात
मृत्यू नंतर त्याचा तिसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत पृथ्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास हजेरी लावली.पण कोणाचेच मृतदेह पाहण्याचे धाडस झाले नाही.