Corona in Delhi: मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी अडवले, संतापलेल्या वकिलाने झाडल्या 5 गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:33 AM2022-01-10T10:33:46+5:302022-01-10T10:34:01+5:30

Delhi Corona News: दिल्लीत कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

Corona in Delhi: Police intercepted for not wearing mask, 5 shots fired by angry lawyer | Corona in Delhi: मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी अडवले, संतापलेल्या वकिलाने झाडल्या 5 गोळ्या

Corona in Delhi: मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी अडवले, संतापलेल्या वकिलाने झाडल्या 5 गोळ्या

Next

नवी दिल्ली: कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या काळात कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर आहे. पण, यादरम्यान दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्क घालण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने पोलिसांसमोरच आपल्या बंदुकीतून पाच गोळ्या झाडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गोळ्या झाडणारा आदेश हा व्यवसायाने वकील आहे. शनिवारी रात्री उशिरा कर्फ्यू दरम्यान सीमापुरी चौकात कार चालवताना पोलिसांनी त्याला पाहिले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो संतापला आणि त्याने आणि पत्नी-बहिणीने पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले.

जमिनीत पाच गोळ्या झाडल्या

त्यानंतर आरोपीने पोलिसांशी वाद घातला आणि त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने जमिनीवर पाच गोळ्या झाडल्या. यादरम्यान इतर पोलिसही तेथे पोहोचले. आरोपी दारुच्या नशेत असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई

कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये तीव्र वाढ होत असताना दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी मास्क न लावल्याबद्दल 5,073 लोकांवर कारवाई केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध शनिवारी 61 एफआयआर नोंदवण्यात आले आणि उल्लंघन करणाऱ्यांकडून 1.25 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आकडेवारीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये मास्कच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल 5,073 जणांना, 74 जणांना सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि 51 जणांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

दिल्लीत कोरोनाचा कहर सुरूच

रविवारी दिल्लीत कोरोनाचे 22,751 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मे नंतर एका दिवसात नवीन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये एकूण 1800 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 182 कोविड असल्याचा संशय आहे. एकूण 1800 रुग्णांपैकी 1442 दिल्लीतील तर 176 दिल्लीबाहेरचे आहेत. यापैकी 440 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असून त्यापैकी 44 रुग्ण गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरवर दाखल आहेत. 
 

Web Title: Corona in Delhi: Police intercepted for not wearing mask, 5 shots fired by angry lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.