Corona Effect: अन् दिल्लीत झाली बर्फवृष्टी, व्हायरल व्हिडीओने थोडी खुशी थोडा गम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:44 PM2020-05-15T16:44:43+5:302020-05-15T16:44:57+5:30
गाड्यांची वर्दळ पूर्ण थांबल्यानं आणि इतर गोष्टींमुळं होणारं प्रदुषण कमी झाल्यानं हवेची गुणवत्ता सुधारली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रदुषण घटले आहे. हवा स्वच्छ झाली आहे, हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याने आकाश निरभ्र आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना फटका बसला असला तरी पर्यावरणाला चांगला फायदा होत असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र, पावसाळा सुरु होण्यापूर्वीच दिल्लीत बर्फवृष्टी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवकाळी बर्फवृष्टीमुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. तर, काहींनी आनंदही व्यक्त केला आहे.
This is not Srinagar or Shimla but Kamla Nagar in Delhi after hail & Rain today! 🌨🌩 #DelhiRainspic.twitter.com/oGbZsg3mLZ
— Rosy (@rose_k01) May 14, 2020
गाड्यांची वर्दळ पूर्ण थांबल्यानं आणि इतर गोष्टींमुळं होणारं प्रदुषण कमी झाल्यानं हवेची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे हवेत असणारे प्रदुषणाचे धुलीकण आणि ढग नाहीसे झाले आहेत. प्रदुषणाचे ढग दूर झाल्यानं दूरवरचे दृश्यही दिसू लागल्याच्या बातम्या आपण वाचल्या. सध्या राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाळी वातावरण पसरले आहे.
This rain is in Goa... pic.twitter.com/be3vTOVf45
— ashok (@ashok__agarwal) May 14, 2020
दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्थर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरुन चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. पण, लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली होती. दिल्लीमध्ये तर गुरुवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पावसानंतर गारा पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बर्फ पडायला लागला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिमला, श्रीनगर सारखीच दिल्लीतही बर्फवृष्टी झाल्याचं या व्हिडीमध्ये पाहायला मिळत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे चिंतादेखील व्यक्त होत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात कोरोनाची भीती वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.