देशात कोरोनामुळे १ ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता, ‘लॅन्सेट’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:06 AM2021-05-09T03:06:31+5:302021-05-09T03:07:20+5:30

भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे.

Corona is expected to kill one million people in the country by August 1, says Lancet | देशात कोरोनामुळे १ ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता, ‘लॅन्सेट’चा अंदाज

देशात कोरोनामुळे १ ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता, ‘लॅन्सेट’चा अंदाज

Next

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. जर अशी स्थिती ओढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ते सर्वांत मोठे अपयश असेल, असेही या नियतकालिकाने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. (Corona is expected to kill one million people in the country by August 1, says Lancet)

भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवर संशोधन करणारी ही जागतिक दर्जाची स्वतंत्र संस्था आहे. तिने केलेल्या भाकिताचा हवाला देत लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, कोरोनावर प्रारंभीच्या काळात मिळविलेल्या यशाने भारताचा वारू उधळला होता. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कृती गटाची त्यामुळे एप्रिलपर्यंत बैठकच झाली नव्हती.


लॅन्सेटच्या संपादकीय म्हटले आहे की, कोरोना साथीची स्थिती हाताळताना आपल्या हातून झालेल्या चुका मोदी सरकारने मान्य करून आता अतिशय पारदर्शकपणे धोरणे राबविली पाहिजेत. हे धोरण द्विस्तरीय असावे. सध्याच्या भोंगळ पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेतील सर्व त्रुटी भारताने दूर कराव्यात व या मोहिमेचा वेग वाढवावा. 

भूलथापा मारण्यात मश्गूल
-    लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वारंवार इशारे देण्यात येऊनही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे असे कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रचंड फैलावला.
-    भारत सामूहिक प्रतिकारशक्तीच्या जवळ आला आहे असे काही जण सांगत होते; पण त्यात काही तथ्य नाही. आपल्यावर होत असलेल्या टीकेबाबत गंभीरपणे विचार करण्याऐवजी मोदी सरकार कोरोना साथ कशी नियंत्रणात आणली याच्या ट्विटरवरून भूलथापा मारण्यात मश्गूल होते.
 

Web Title: Corona is expected to kill one million people in the country by August 1, says Lancet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.