देशात २९ जणांना कोरोना; विदेशात १८ भारतीय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:26 AM2020-03-05T06:26:58+5:302020-03-05T06:27:10+5:30
परदेशात राहणाऱ्या १८ भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २९ झाली असून, परदेशात राहणाऱ्या १८ भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.
संसर्ग झालेल्यांत १६ इटालियन असून, त्यांच्या ड्रायव्हरलाही लागण झाली आहे. त्यांना आयटीबीपीच्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. आग्ºयामध्ये सहा, केरळमध्ये तीन आणि दिल्ली व तेलंगणात प्रत्येकी एक असे हे रुग्ण आहेत. पुण्यातही पाच संशयित आढळून आल्याची माहिती आहे.
हे पर्यटक ज्या हॉटेलात उतरले, ज्या विमानाने आले, त्यांचे गाइड अशा सर्वांची तपासणी होत आहे. हे पर्यटक राजस्थानला गेले होते. तिथेही तपासणी सुरू आहे. बंगळुरूमध्ये इंटेल कंपनीच्या कर्मचाºयाला लागण झाल्याची शंका आहे. विमानाने प्रवास करणाºया प्रत्येकाची आता तपासणी होणार आहे. आतापर्यंत १२ देशांतील प्रवाशांचीच कडक तपासणी होत होती.
हस्तांदोलन नको, ‘नमस्ते’ करा
परदेशात व भारतात लोक एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करतात. पण परदेशात लोक हस्तांदोलन टाळत आहेत. पण आता भारतीय संस्कृतीतील नमस्काराची पद्धत तिथे रूढ होत आहे. अनेक देशांतील लोकांनी मांसाहार बंद केला असून, ते शाकाहाराकडे वळत आहेत.
>भाजपची होळी रद्द
कोरोनाच्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भाजपने होळी मिलन कार्यक्रमच रद्द केला. दरम्यान राहुल गांधी २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून भारतात परतले. त्यांनी बुधवारी आपली तपासणी करून घेतली. त्यांच्यात कोरोना संसर्गाची लक्षणे आढळली नाहीत.
>जयपूरहून परतलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना सक्तीची सुट्टी
मुंबई : कोरोनाच्या भीतीपोटी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील दहावीच्या दोन वर्गातील चाळीसहून अधिक
विद्यार्थी आणि सात ते आठ शिक्षकांना
१४ दिवसांची सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे. जयपूरला सहलीला गेलेले हे
विद्यार्थी मुंबईला परतल्यानंतर त्यांना विमानतळावरच हा आदेश मिळाला. कोरोनाचा एक रुग्ण जयपूरला आढळल्याने शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.