राजधानीत कोरोनाचा हाहाकार, देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत, अशी आहे देशाची स्थिती
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 22, 2020 06:34 PM2020-11-22T18:34:15+5:302020-11-22T18:35:45+5:30
सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नवी दिल्ली - कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सर्वाधिक पहायला मिळत आहे. येथे देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू नोंदवले जात आहेत. एवढेच नाही, तर काही फॅक्ट्स आणि नवा रिपोर्ट भविष्यातील भयावह परिस्थितीचा सायरण वाजवत आहे. गेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे.
सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशभरात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे विचार केल्यास, कोरोनामुळे देशात प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. तर प्रत्येक 10वा रुग्ण दिल्लीतून आहे. आतापर्यंत दिल्लीत 8 हजार 270 जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या 24 तासांत येथे 45 हजारहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी 5879 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थात प्रत्येक 100 पैकी 13 लोक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत करोनाचे 39 हजार 741 रुग्ण सक्रिय आहेत.
गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा -
21 नोव्हेंबर-111
20 नोव्हेंबर- 118
19 नोव्हेंबर- 98
18 नोव्हेंबर-131
17 नोव्हेंबर- 99
16 नोव्हेंबर-99
आयएलबीएस डायरेक्टर डॉक्टर एसके सरीन म्हणाले, मास्कवर 2000 रुपयांचा दंड म्हणजे काही दंड नाही. ही सायंस समजावण्याची पद्धत आहे, जे लोकांनी ऐकले नाही. प्रॉपर मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. खोकलल्याने, शिंकल्याने आणि मोठ्याने हसल्याने व्हायरस पसरतो. म्हणून मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.
कशी आहे देशाची स्थिती -
देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 45209 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 9095806वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 133227 जणांचा मृत्यू झाला आहे.