Corona in India: सरकारचा इशारा; 5-10 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:01 PM2022-01-10T17:01:34+5:302022-01-10T17:02:03+5:30

Corona in India: केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, हॉस्पिटलायझेशन प्रकरणे, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Corona in India: Governments warning; 5-10% of active patients need to be hospitalized, but situation would be changed | Corona in India: सरकारचा इशारा; 5-10 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज, पण...

Corona in India: सरकारचा इशारा; 5-10 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज, पण...

Next

नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना सरकारने सोमवारी महत्वाची माहिती दिली. सरकारने सांगितल्यानुसार, फक्त 5 ते 10 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येतीये. पण ही परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशाराही सरकारने दिला आहे. केंद्राने राज्यांना पत्र लिहून म्हटले की, "दुसऱ्या लाटेत 20-23% अॅक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशन आवश्यक होती, त्या तुलनेत तिसऱ्या लाटेत फक्त 5-10% रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज भासत आहे. 

सरकारने सांगितले की, या क्षणी परिस्थितीबद्दल काहीही ठोस माहिती नाही. पण, येत्या काळात परिस्थिती बदलू शकते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढू शकते. केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, हॉस्पिटलायझेशन प्रकरणे, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर दररोज लक्ष ठेवण्यास सांगितले.

केंद्राने राज्यांना आरोग्य सुविधांद्वारे आकारले जाणारे पैसे न्याय्य आहेत याची खात्री करण्यास सांगितले. तसेच, ओव्हरचार्जिंगच्या बाबतीत निरीक्षण आणि कारवाईसाठी यंत्रणा तयार करा. कोविड केअर सेंटरमधील बेड्स ऑक्सिजनसाठी समर्पित बेडमध्ये आणि आवश्यकतेनुसार अपग्रेड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
 

Web Title: Corona in India: Governments warning; 5-10% of active patients need to be hospitalized, but situation would be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.