Corona in Karnataka: बंगळुरुमध्ये 11 दिवसांत 543 मुले कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:04 PM2021-08-13T19:04:35+5:302021-08-13T19:05:50+5:30

Corona in Karnataka : बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

Corona in Karnataka: 543 children corona positive in 11 days in Bangalore, administration shakes | Corona in Karnataka: बंगळुरुमध्ये 11 दिवसांत 543 मुले कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन हादरले

Corona in Karnataka: बंगळुरुमध्ये 11 दिवसांत 543 मुले कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन हादरले

Next

बंगळुरू : कर्नाटकात राजधानी बंगळुरूमधील मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पालक आणि प्रशासन हादरले आहे. गेल्या १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-१८ वयोगटातील ५४३ मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे.

बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ९-१२ वीच्या वर्गातील मुलांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची शक्यता कर्नाटक सरकारने वर्तविली आहे. या महिन्याच्या अखेरीस शाळा उघडल्या जाऊ शकतात.

काय म्हणाले आरोग्य अधिकारी?
काही दिवसांत मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे तिप्पट होऊ शकतात आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ते म्हणाले "या विषाणूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना फक्त घरात ठेवू शकता. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांइतकी जास्त नसेल. पालकांनी आपल्या मुलांना घरात ठेवणे खूप महत्वाचे आहे."


राज्यात कोरोनासंबंधी कडक निर्बंध
कर्नाटक सरकारने यापूर्वीच आदेश दिले आहेत की राज्यात नाइट कर्फ्यू आणि आठवड्याच्या वीकेंड कर्फ्यू  सुरू राहील. याशिवाय केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तास आधीचा आहे, तेच राज्यात प्रवेश करू शकतात.

कर्नाटकात गेल्या महिन्याभरात दररोज जवळपास कोरोनाचे १५०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत. नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दर महिन्याला ६५ लाख ते १ कोटी पर्यंत लसीकरण वेगवान करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Corona in Karnataka: 543 children corona positive in 11 days in Bangalore, administration shakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.