Corona News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारींना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:57 PM2022-01-04T12:57:25+5:302022-01-04T12:58:18+5:30

Corona News: भारतात मागील 24 तासात कोरोनाचरे 37,379 रुग्ण आढळले असून, 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona News: After Chief Minister Arvind Kejriwal, BJP MP Manoj Tiwari infected with corona | Corona News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारींना कोरोनाची लागण

Corona News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारींना कोरोनाची लागण

Next

नवी दिल्ली: देशात कोरोना महामारी पुन्हा एकदा भयावह बनत आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास सांगितले. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी केजरीवाल यांनीही ट्विट करून आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. त्यांचे सर्व कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आल्या आहेत. 

अनेक नेते पॉझिटिव्ह
केजरीवाल यांनी 2 जानेवारीला लखनऊ आणि 3 जानेवारीला उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये सभा घेतल्या ही चिंतेची बाब आहे. त्या सभेत केजरीवाल मास्कशिवाय दिसले होते. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, कुटुंबातील एक सदस्य आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी स्वतःला वेगळे केले आहे. 

24 तासात कोरोनाची 37 हजार प्रकरणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत भारतात कोरोनाचे 37,379 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 11,007 रुग्ण बरेही झाले. अशा प्रकारे देशातील दैनिक पॉझिटिव्हिटी दर 3.24% वर गेला आहे. देशात सध्या 1,71,830 सक्रिय प्रकरणे असून, 3,43,06,414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, मृतांचा आकडा 4,82,017 वर पोहोचला आहे.

देशात कोरोनाची झपाट्याने वाढ

महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. Omicron प्रकरणे देखील वाढत आहेत. बहुतेक नवीन प्रकरणे ओमायक्रॉन प्रकारांची आहेत, परंतु अचूक माहिती उपलब्ध नाही कारण नवीन प्रकार शोधण्यासाठी जीनोम सीक्वेन्सिग आवश्यक आहे आणि सर्व संक्रमित व्यक्तींचे जीनोम सीक्वेन्सिग करणे हे खूप कठीण काम आहे.

Web Title: Corona News: After Chief Minister Arvind Kejriwal, BJP MP Manoj Tiwari infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.