Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 10:42 PM2021-02-07T22:42:00+5:302021-02-07T22:44:08+5:30
Uttarakhand glacier burst : जेव्हा उत्तर भारतातून हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला होता.
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये आज जी घटना घडली त्याला वैज्ञानिकांनी कोरोनाला जबाबदार धरले आहे. एकीकडे उत्तराखंडच्याच संशोधकांनी आठ महिन्यांपूर्वी इशारा दिल्याचा दावा केलेला असताना आता नवीन कोरोना दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. (due to corona lockdown Pollution decresed ans sun rays directly on Glaciar.)
वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. यामुळे जलवायूमध्ये परिवर्तन झाले आणि वरचे वातावरण एवढे साफ झाले की हिमकड्यावर साठलेला बर्फ हळू हळू वितळू लागला. यामुळे हिमकड्याला तडे गेले आणि हिमनदीचे साचलेले पाणी कोसळले. भविष्यात देखील असे प्रकार वाढण्याचा धोका या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विज्ञान सोसायटीचे उत्तर भारताचे अध्यक्ष आणि वरिष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. एसपी भारद्वाज यांनी हा दावा केला आहे. हा हिमकडा कोसळण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतू प्रथमदृषट्या असे दिसतेय की सूर्याची किरणे थेट बर्फावर पडली आणि बर्फ वेगाने वितळला. यामुळे वरती जमलेला बर्फ कोसळला. यामुळे धौलगंगा नदीमध्ये वेगाने पाणी कोसळले. सध्या हिमालयामध्ये प्रदूषणाचे कण काहीच नाहीएत. यामुळे आधीपेक्षाही अधिक तीव्रतेची किरणे पडू लागली आहेत.
डॉक्टर एसपी पाल यांनी सांगितले की, कोरोनामुळे जगभरात लॉक़डाऊन झाले. यामुळे प्रदूषण कमी झाले. जेव्हा उत्तर भारतातून हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला होता.
उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. या दुर्घटनेत 176 हून अधिक कामगार बेपत्ता असून आतापर्यंत 16 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर 7 जणांचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंडच्याच वैज्ञानिकांनी तब्बल 8 महिन्यांपूर्वी इशारा दिला होता. उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागांत असे बर्फ आहेत जे कधीही तुटू शकतात. यासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या काराकोरममधील श्योक नदीचे उदाहरण दिले होते. सध्या 22-23 जून 2020 आणि 29 मे 2020 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे असेच मोठे बर्फ बंधारे बनले आहेत. ते कधीही फूटू शकतात असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. मात्र, त्यांच्य़ाकडे यावर काही उपाय नाहीय.