चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:29 PM2022-12-22T15:29:42+5:302022-12-22T15:29:51+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल यांचे म्हणणे आहे की, भारतात 95% टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.

Corona outbreak in China, lockdown in India? IMA doctor warned | चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा...

चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा...

googlenewsNext


China Corona: चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. रोज हजारोंच्या संख्येने केसेस वाढत आहेत. परिस्थिती इतकी बिटक झाली आहे की, रुग्णालयांमध्ये रुग्णांना ठेवायला जागा नाही. मेडिकल स्टोअरमध्येही औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर दिसत आहे. चीनशिवाय अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्येही कोविडची प्रकरणे आणि मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे भारतही अलर्ट मोडवर आला आहे. भारतात चीनसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भीती लोकांना वाटत आहे. 

भारतात गंभीर परिणाम दिसणार नाही
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल म्हणतात की, भारतातील 95% लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे, त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही. चीनच्या लोकांपेक्षा भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाली आहे. भारताने आता कोविडपासून बचाव करण्याच्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. या अंतर्गत चाचणी आणि ट्रेसिंग वाढवण्याची गरज आहे.

Omicron चा bf.7 प्रकार भारतात दाखल
एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. अंशुमन कुमार म्हणतात की, ओमिक्रॉनचे bf.7 प्रकार अनेक महिन्यांपासून भारतात आहे. त्यामुळे येथे केवळ फ्लूसारखी लक्षणे दिसू लागली आहेत. हा प्रकार चीनप्रमाणे भारतासाठी धोकादायक ठरणार नाही, तरीही लोकांनी कोविडबाबत आताच सावध राहणे आवश्यक आहे. बाहेर पडताना मास्क घाला आणि स्वच्छतेची काळजी घ्या.

भारतातही लसीकरण वेगाने होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.03 कोटी डोस देण्यात आले आहेत. लसीकरण चीनपेक्षा बरेच चांगले आहे. भारतात कोविड विरुद्ध प्रतिकारशक्ती चांगली झाली आहे. तसेच Omicron चे सर्व प्रकार येथे आधीच आले आहेत. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. असे तज्ञांचे मत आहे.

जीनोम सीक्वेन्सींग वाढवणे
कोविडमधील म्यूटेशन किंवा कोणतेही नवीन प्रकार ओळखण्यासाठी देशात जीनोम सीक्वेंसिंग वाढविला जात आहे. यासंदर्भात सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली, त्यानंतर लोकांना कोविडबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. मास्क वापरण्याचा आणि बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच विमानतळावरील तपासातही वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Corona outbreak in China, lockdown in India? IMA doctor warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.