Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:42 PM2022-01-19T14:42:41+5:302022-01-19T14:43:28+5:30

मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली

Corona Pandemic: Success Story of Woman Pilot Laxmi Joshi Who Flew To China As Part Of Vande Bharat Mission | Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

Next

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात हजारो भारतीय लॉकडाऊनमुळे इतर देशांमध्ये अडकले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आले. त्यात परदेशात असलेले भारतीय मायदेशी परतण्याची आस लावून बसले होते. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन हाती घेतलं. याच मिशनचा स्वइच्छेने भाग बनलेल्या पायलट लक्ष्मी जोशीनं महामारीच्या काळात एकाच महिन्यात ३ विमान उड्डाण घेतल्याचा अनुभव शेअर केला.

लक्ष्मी जोशी केवळ ८ वर्षाची होती. जेव्हा ती पहिल्यांदा विमानातून प्रवास करत होती. त्याचवेळी लक्ष्मीनं पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. लक्ष्मी जोशी त्या पायलटपैकी एक आहे. ज्यांनी वंदे भारत मिशनसाठी स्वइच्छेने पुढाकार घेतला. मे २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आणले होते. कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी हे मिशन हाती घेतलं. त्यात लक्ष्मीचंही योगदान होतं.

ह्युमन ऑफ बॉम्बे मुलाखतीत लक्ष्मी जोशीनं तिचा पायलट होण्याचा प्रवास सगळ्यांसमोर उलगडला आहे. पायलट बनवण्याचं स्वप्न पाहिलं परंतु ते पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी मोलाची साथ दिली. मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली. त्यानंतर पायलट प्रशिक्षण पूर्ण करत तिला उड्डाण करण्याचा परवाना मिळाला. माझ्या स्वप्नांना पंख मिळाले त्यामुळे मी खूप उत्साहीत होते. मला एअर इंडियात नोकरी मिळाल्याचं लक्ष्मीनं सांगितले.

लक्ष्मी म्हणते, माझ्या आयुष्यात सर्वात मोठे मार्गदर्शक माझे वडीलच आहेत. जेव्हा कुणी नातेवाईक विचारतो तुमची मुलगी कधी आणि केव्हा सेटेल होणार? त्यावर वडील सांगतात माझी मुलगी उडण्यासाठी बनलेली आहे. लक्ष्मी जोशी तिच्या नोकरीवर खूप प्रेम करते परंतु त्याशिवाय तिला दुसरं काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे जेव्हा कोरोना महामारी आली आणि वंदे भारत मिशन पुढे आलं तेव्हा तिने परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उड्डाण घेतले.

जेव्हा लक्ष्मीनं या मिशनमध्ये भाग घेण्याचं ठरवलं तेव्हा तिचे आई वडील चिंतेत होते. तेव्हा हे मिशन किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्ष्मीनं तिच्या आईवडिलांना सांगितले. या मिशनद्वारे लक्ष्मीचं पहिलं उड्डाण चीनच्या शांघाय येथे होते. ती सांगते की, मी त्याला उड्डाणाला कधीही विसरु शकत नाही. चीनमध्ये कोविड मोठ्या प्रमाणात पसरला होता. कारण प्रत्येक व्यक्ती बाधित झाला होता. परंतु आमचं उद्दिष्ट एकच होतं भारतीयांना वाचवणं. आम्ही उड्डाणावेळी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली होती. जेव्हा आम्ही चीनहून भारतात परतलो तेव्हा सगळ्यांनी आमचं कौतुक केले. एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली आणि मला तुझ्यासारखं बनायचं आहे असं ती म्हणाली.

Web Title: Corona Pandemic: Success Story of Woman Pilot Laxmi Joshi Who Flew To China As Part Of Vande Bharat Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.