अरेरे! आईचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची भीक मागत होता लेक; बदल्यात मिळाली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:04 PM2021-05-05T20:04:21+5:302021-05-05T20:11:22+5:30

Corona patient death : आईचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात  डॉक्टरांकडून ऑक्सिजनची भीक मागत राहिला. अखेर ऑक्सिजनअभावी आईचा मृत्यू झाला.

Corona patient death : Son begging for oxygen to save mother life in kannauj uttar pradesh | अरेरे! आईचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची भीक मागत होता लेक; बदल्यात मिळाली मारहाण

अरेरे! आईचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची भीक मागत होता लेक; बदल्यात मिळाली मारहाण

Next

सध्याच्या स्थितीत मोठ्या संख्येनं लोकांना कोरोनाचं संक्रमण होत असल्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. अशा स्थितीत डॉक्टर, इतर वैद्यकिय कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील वाद विकोपाला जात आहे. अशीच एक खळबळजनक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील राजकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक मुलगा आईचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात  डॉक्टरांकडून ऑक्सिजनची भीक मागत राहिला. अखेर ऑक्सिजनअभावी आईचा मृत्यू झाला.

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

ऑक्सिजन न मिळाल्याने आपल्या मुलासमोर आईचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या मृत्यूमुळे त्रस्त असलेल्या मुलाला तिथे उपस्थित एका डॉक्टरने त्याला मारहाण केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस घटनास्थळी हजर होते पण कोणत्याही पोलिसाने डॉक्टरला मारहाण करण्यापासून रोखले नाही.

 कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

एका खासगी वृत्तपत्रातील पत्रकाराच्या सासूला आजारामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात बेड नसल्यामुळे पीडिताने महिलेवर जमिनीवर उपचार सुरु केले. दरम्यान, महिलेला अचानक ऑक्सिजनची आवश्यकता भासली. पण तिला रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नाही. मृत महिलेचा मुलगा ऑक्सिजनची भीक मागत होता परंतु ऑक्सिजनऐवजी त्याला मारहाण करण्यात आली.

पीडित राहुल पालने सांगितले की, '' आईला श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून रुग्णवाहिकेतून वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी बेड पुरवला नाही. 'मी काय ऑक्सिजन बनवितो,  जे करायचे आहे ते करा' असे उपस्थित डॉक्टरांचे म्हणणे होते.''  ऑक्सिजनच्या अभावामुळे आईचा मृत्यू झाला. आता मृतकाचा मुलगा राहुल यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: Corona patient death : Son begging for oxygen to save mother life in kannauj uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.