भारतात कोरोना रुग्णसंख्या ४६ लाखांवर; ९७,५७० नवे रुग्ण सापडल्याचा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:25 AM2020-09-13T05:25:29+5:302020-09-13T05:25:48+5:30
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ आॅगस्ट रोजी २० लाखांचा पल्ला गाठला होता.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचे ९७,५७० नवे रुग्ण आढळून आले असून तो नवा उच्चांक आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ४६ लाखांहून अधिक झाली आहे, तर ३६,२४,१९६ जण या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे आणखी १,२०१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ७७,४७२ झाली आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ आॅगस्ट रोजी २० लाखांचा पल्ला गाठला होता. २३ आॅगस्ट रोजी ३० लाख, तर ५ सप्टेंबर रोजी ४० लाखांचा टप्पा कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला होता. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ८,२३१, कर्नाटकात ७,०६७, आंध्र प्रदेशमध्ये ४,७७९, दिल्लीमध्ये ४,६८७, उत्तर प्रदेशमध्ये ४,२८२, पश्चिम बंगालमध्ये ३,८२८, गुजरातमध्ये ३,१८०, पंजाबमध्ये २,२१२ इतकी आहे. बळी गेलेल्यांपैकी ७० हून अधिक टक्के लोक एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त होते.
आरोग्य मंत्रालयानुसार ९ राज्यांत
74%
रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील
48.8%
रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येच आहेत. ईशान्येकडील ८ राज्यांत एकूण पाच टक्के कोरोना रुग्ण आहेत. आसामचा वाटा
68%
आहे. पाच राज्यांत बरे होणाऱ्यांचा दर
60%
असून त्यात महाराष्ट्र १९.७, तामिळनाडू १२.३, आंध्र प्रदेश १२, कर्नाटक ९.२ आणि उत्तर प्रदेश ६.३ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्यानुसार कोरोनाची एकूण रुग्ण संख्या
46,59,984
झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण आहे
77.77%
1.66%
इतका कमी रुग्णांचा मृत्यूदर राखण्यात यश आले. देशात सध्या
9,58,316
कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत २०.५६ टक्के इतके आहे.
भारतात सलग तिसºया दिवशी
95,000
पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोज रुग्ण सापडत राहिले, तर येत्या चार-पाच दिवसांत हा आकडा
50,00,000
चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
कोरोना चाचण्यांची संख्या ५ कोटी ५१ लाख
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ११ सप्टेंबर रोजी देशात
10,91,251
कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
त्यामुळे आता कोरोना
चाचण्यांची एकूण संख्या
5,51,89,226
झाली आहे.