दिलासादायक... देशात कोरोना रुग्ण मृत्यूदर अवघा 1.58%
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 02:46 AM2020-09-28T02:46:05+5:302020-09-28T02:46:53+5:30
50% अमेरिकन लस टोचून घेणार नाहीत
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण मृत्यूदर अवघा १.५८ टक्के आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशातील रुग्णसंख्या ५९ लाख ९२ हजारांवर पोहोचली आहे. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे ही समाधानाची बाब आहे.
50% अमेरिकन लस टोचून घेणार नाहीत
कोरोना प्रतिबंधक लस नजीकच्या काळात उपलब्ध झाली तरी ती आम्ही अजिबात टोचून घेणार नाही, असे अमेरिकेतील ५० टक्के नागरिकांनी ठरविले आहे. यासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरने केलेल्या या नव्या सर्वेक्षणासाठी सुमारे १ लाख नागरिकांची मते अजमाविण्यात आली.
नवी
दिल्लीतील एका कोविड सेंटरमध्ये योगा करणारे हे रुग्ण.
भाजप नेत्या उमा भारती
यांना कोरोनाची लागण
माजी केंद्रीय मंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. हिमालय यात्रेदरम्यान सर्व नियमांचे पालन करूनही अखेर मला कोरोनाने गाठलेच, असे त्यांनी म्हटले आहे. ऋषिकेशच्या जवळ वंदे मातरम कुंज येथे उमा भारती आता क्वारंटाईनमध्ये राहत आहेत.
देशामध्ये रविवारी कोरोनाचे
88,600
नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या
59,92,532
झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, या संसर्गाने आणखी
1,124
जण मरण पावले असून एकूण बळी
94,503
वर पोहोचले आहेत. या आजारातून
49,41,627
जण आतापर्यंत बरे झाले असून
9,56,402
कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा
1.58%
आहे. देशभरात आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या
7,12,57,836
झाली आहे.