कोरोनाचा कहर : 2 लाख 73 हजार नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:55+5:302021-04-20T04:32:06+5:30
१५ दिवसांत २५ लाख रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात एका दिवसात विक्रमी २ लाख ७३ हजार ८१० कोरोना रुग्ण आढळून आले.
देशात गत १५ दिवसांत जवळपास २५ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या दीड कोटींवर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १९ लाखांवर गेली आहे. देशात एका दिवसात १,६१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या १,७८,७६९ वर पोहोचली आहे. देशात १९ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या १ कोटीहून अधिक झाली होती. त्यानंतर, १०७ दिवसांत ५ एप्रिल रोजी रुग्ण सव्वा कोटी झाले. सक्रिय रुग्णांची संख्या १९,२९,३२९ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन ८६ टक्के झाले आहे. मृत्युदर १.१९ टक्के आहे. गत २४ तासांत ज्या १,६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५०३ महाराष्ट्रातील, १७० छत्तीसगड, १६१ दिल्ली, १२७ उत्तर प्रदेश, ११० गुजरात, ८१ कर्नाटक, ६८ पंजाबमधील, ६६ मध्य प्रदेश, ५० झारखंड, प्रत्येकी ४२ राजस्थान आणि तामिळनाडू, २९ हरयाणा, २८ प. बंगाल आणि २५ केरळमधील होते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द
n लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुढील आठवड्यातील भारत भेट भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे रद्द झाली आहे, असे डाऊनिंग स्ट्रीटने सोमवारी म्हटले.
n भविष्यातील भागीदारीच्या योजना सुरू करण्यासाठी जॉन्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या महिन्यात चर्चा करतील. उभयतांची भेट या वर्षाअखेर अपेक्षित आहे.