CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय?, घरीच जाणून घ्या रेस्पिरेटरी रेट; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:48 PM2020-06-10T16:48:27+5:302020-06-10T17:53:17+5:30
संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
नवी दिल्ली - देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही अडीच लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरू नका. घरीच रेस्पिरेटरी रेट जाणून घेता येतो. आरोग्यमंत्र्यांनी याचा एक फॉर्म्युला सांगितला आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी फॉर्म्युला सांगितला आहे. कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आपला रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वसन दर तपासा. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज आहे की नाही हे समजेल असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णांचा रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वसन दर एका मिनिटाला पंधरापेक्षा जास्त आहे, ते सर्व मॉडरेट कॅटगिरीत येतात. ज्या रुग्णांचा श्वसन दर प्रति मिनिट 30 पेक्षा अधिक आहे ते गंभीर स्थितीत येतात. फक्त मध्यम आणि गंभीर परिस्थिती येणाऱ्या रुग्णांनाच उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज आहे.
CoronaVirus News : डिस्चार्ज देताना रुग्णालयाने आकारलेलं बिल पाहून नातेवाईकांना बसला धक्काhttps://t.co/sVWC6b4dBD#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2020
लक्षण नसलेले किंवा सौम्य लक्षण असलेले रुग्ण ज्यांचा रेस्पिरेटरी रेट 15 पेक्षा कमी आहे. त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही, ते होम क्वारंटाईन होऊ शकतात असं देखील सतेंद्र जैन यांनी म्हटलं आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञ आरोग्यमंत्र्यांच्या या फॉर्म्युल्याशी सहमत नाही. ज्या रुग्णांना इतर आजार आहेत, त्यांना हा फॉर्म्युला लागू नाही होणार. कारण असे अनेक आजार आहेत, ज्याच्यामध्ये हेल्थ पॅरामीटर वरखाली होत असतात आणि या हेल्थ पॅरामीटरवर फक्त रुग्णालयातच लक्ष ठेवता येऊ शकतं अशी माहिती ही तज्ज्ञांनी दिली आहे.
नासा अलर्ट! येत्या 2-3 दिवसांत पृथ्वीच्या दिशेने येतंय 'हे' मोठं संकटhttps://t.co/eXP2RBBFgc#NASA#Earth
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2020
दिल्लीतील मेडॉर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. मनोज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फॉर्म्युला ज्यांना हृदयाची समस्या, ब्लड प्रेशर किंवा मधुमेहासारखा दुसरा कोणता आजार नाही अशा तरुण रुग्णांनाच हा फॉर्म्युला लागू होईल. जर तुम्ही कोरोनाग्रस्त आहात आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. वृद्ध व्यक्तींना हा फॉर्म्युला लागू होऊ शकत नाही. वयस्कर व्यक्तींचं हेल्थ पॅरामीटर वेगानं बदलतं. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. असे कित्येक वयोवृद्ध आहेत, जे घरात एकटे राहतात आणि त्यांची देखभाल फक्त रुग्णालयातच होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुक्त राज्यांमध्ये पुन्हा वाढतेय रुग्णांची संख्या; 'हे' आहे कारणhttps://t.co/FSLRFJX2gc#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
धाडसी निर्णय! कधी काळी सॉफ्टबँकेची ऑफर धुडकावली; आज अब्जाधीशाकडे वाटचाल
'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही...
बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा
CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?
इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ