धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह इन्स्पेक्टरने उचललं टोकाचं पाऊल, रुग्णालयात केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 04:21 PM2020-11-22T16:21:00+5:302020-11-22T16:23:13+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णालयात भरती असलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह इन्स्पेक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत असून रुग्णांची सेवा करत आहे. याच दरम्यान अनेक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील दीनदयाल रुग्णालयात भरती असलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह इन्स्पेक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. रुग्णालयात हाताची नस कापून घेऊन आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील क़्वार्सी भागातील सूर्य विहार कॉलनीत राहणारे इन्स्पेक्टर दिनेश शाहजहांपुरमध्ये तैनात होते.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! "देशातील 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका"https://t.co/QxvWPGOn0J#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) November 22, 2020
कार्यरत असतानाच दिनेश यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते काही दिवस तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान त्यांनी त्यातच शनिवारी रात्री उशिरा हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.
दिनेश यांना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने टोकाचं पाऊल उचललं होतं. कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. उत्तर प्रदेशच्या इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापीठातील कोविड वॉर्डमध्ये ही घटना घडली होती.
कोरोनाचा हाहाकार! आता "या" राज्यात नाईट कर्फ्यू; मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड https://t.co/jXsJCPdG4d#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) November 22, 2020