CoronaVirus News : धूप जलाओ, व्हायरस भगाओ! कोरोनापासून बचाव करण्यासाठी हर्बल धूप करणार मदत; जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:56 PM2022-01-31T14:56:48+5:302022-01-31T15:07:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात आता प्रथमच हर्बल धूप कोरोना व्हायरसपासून संरक्षण करणार आहे.

corona protection by herbal dhoop study done by bhu shows result while expert in delhi support study | CoronaVirus News : धूप जलाओ, व्हायरस भगाओ! कोरोनापासून बचाव करण्यासाठी हर्बल धूप करणार मदत; जाणून घ्या, कसं?

CoronaVirus News : धूप जलाओ, व्हायरस भगाओ! कोरोनापासून बचाव करण्यासाठी हर्बल धूप करणार मदत; जाणून घ्या, कसं?

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,09,918 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 959 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख 90 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. जगभरात संशोधन करण्यात येत आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगभरात आता प्रथमच हर्बल धूप कोरोना व्हायरसपासून संरक्षण करणार आहे. एअरवैद्य असं या हर्बल धूपचं नाव आहे. 

हर्बल धूप घरीच जाळल्याने कोरोना संसर्गाचा धोका तर कमी होतोच, पण घरात कोरोनाचा रुग्ण असल्यास इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही टळतो. या धूपमुळे कोरोनाचा संसर्ग रुग्णाच्या फुफ्फुसात पोहोचत नाही. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर प्रीती छाबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूप पद्धत ही वैदिक काळापासून वापरली जात आहे, प्रत्येकाला सर्व औषधी वनस्पतींची माहिती नसल्यामुळे, त्यांच्यासाठी एअरवैद्य धूप प्रभावी आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) ही उदबत्ती तयार केली असून जगात प्रथमच धूप पद्धतीवर संशोधन केल्यानंतर एअरवैद्य तयार करण्यात आला आहे.

डॉ. के.आर.सी. रेड्डी, रसशास्त्र विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, BHU यांनी माहिती दिली आहे. यामध्ये ICMR च्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री (CTRI) कडून नोंदणी मिळाल्यानंतर, 19 वनौषधींपासून तयार केलेल्या एअरवैद्य हर्बल धूप (AVHD) ची दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. एमिल फार्मास्युटिकलच्या सहकार्याने हे संशोधन करण्यात आले आहे. आयुर्वेदाचे हे उत्पादन कोरोनाचे प्रतिबंध, प्रसार आणि उपचार सुलभ व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरू शकते. यासोबतच नवी दिल्लीस्थित एमिल फार्मास्युटिकलचे कार्यकारी संचालक डॉ. संचित शर्मा यांनी देखील माहिती दिली. 

शर्मा यांनी एअरवैद्यमध्ये राळ, कडुनिंब, हळद, लेमनग्रास, तुळस, मोहरी, चंदन, उसीर, मेंदी, नागर, लोबन धूप, कापूर यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये एकूण चार प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून आले आहेत जे अँटी-व्हायरस, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल आणि इम्युनिटी एन्हान्सर आहेत. जे कोरोना व्हायरसवर काम करतात. या रिसर्चसाठी कंट्रोल ग्रुपमध्ये 100 आणि इंटरवेन्शन ग्रुपमध्ये 150 लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये इंटरवेन्शन ग्रुपला सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटे एअरवैद्यची देण्यात आला, तर दुसऱ्या ग्रुपला एअरवैद्य देण्यात आली नाही. दोन्ही ग्रुपला सामान्य कोरोना प्रोटोकॉल पाळण्यास सांगितले होते.

एक महिन्यानंतर जे निकाल आले ते धक्कादायक होते. इंटरवेन्शन ग्रुपमध्ये फक्त सहा जणांमध्ये म्हणजेच चार टक्के लोकांना कोरोना संसर्गासारखी लक्षणे होती, तर कंट्रोल ग्रुपमधील 37 जणांमध्ये म्हणजेच 37 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. रेड्डी यांनी एअरवैद्य धुपमुळे कोरोना किंवा इतर कोणत्याही व्हायरल संसर्गाचा धोका कमी होतो असं म्हटलं आहे. तो हवेतील व्हायरस निष्क्रिय करतो, ज्यामुळे कोविडचा प्रसार कमी होतो. अशा परिस्थितीत जर घरात कोरोनाचा रुग्ण असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका शून्य होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: corona protection by herbal dhoop study done by bhu shows result while expert in delhi support study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.