corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:57 AM2020-03-07T11:57:04+5:302020-03-07T11:58:46+5:30

आयसोलेशन वॉर्डात डॉक्टर इतर रुग्णांना तपासत असताना या महिलेने तेथून पळ काढला. तेथील एका रुग्णाने सांगितले की, ती महिला पळून गेली.

corona suspected irish woman missing from cuttack hospital | corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्...

corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्...

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे तीन हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच ओडिशा येथे कोरोना व्हायरस संशयीत महिला रुग्णालयातून पसार झाल्याने गोंधळ उडाला आहे.

कटकमधील एका रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलेल्या कोरोना व्हायरस संशयीत आयर्लंडची महिला फरार झाली होती. भूवनेश्वर येथील एका हॉटेलमध्ये आराम करताना ही महिला आढळून आली आहे. गुरुवारी येथील विमानतळावर आयर्लंड येथून आलेल्या एका महिलेला ताप असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर महिलेला कॅपिटल रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर महिलेला कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमधील आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले होते.

दरम्यान आयसोलेशन वॉर्डात डॉक्टर इतर रुग्णांना तपासत असताना या महिलेने तेथून पळ काढला. तेथील एका रुग्णाने सांगितले की, ती महिला पळून गेली. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर कोरोना व्हायरस संशयीत महिलेला भूवनेश्वर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या स्वाधीन केले.

याआधी राजस्थानची राजधानी जयपूर येथील कोरोना संशयीत रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोना संशयीत रुग्ण दाखल झाल्याचे कळताच दहा मजली रुग्णालयातील इतर रुग्णांनी आयसीयुसहित सर्व वॉर्डातून सुट्टी घेतली होती. यावरून कोरोनाविषयी सामान्यांमध्ये दहशत असल्याचे स्पष्ट होते.
 

Web Title: corona suspected irish woman missing from cuttack hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.