तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:23 PM2020-06-29T14:23:15+5:302020-06-29T17:33:54+5:30

गृहमंत्री मोहम्मद अली यांचा सुरक्षा रक्षक यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. तरीही, गृहमंत्र्यानी स्वत:ला होम क्वारंटाईन केले नाही.

Corona to Telangana Home Minister, excitement over attendance at public event | तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ

तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तेलंगणातही कोरोनाबाधितत रुग्णांची संख्या वाढली असून परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. सोमवारी तेलंगणातील गृहमंत्री मोहम्मद अली यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

गृहमंत्री मोहम्मद अली यांचा सुरक्षा रक्षक यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. तरीही, गृहमंत्र्यानी स्वत:ला होम क्वारंटाईन केले नाही. विशेष म्हणजे 26 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक बनली असून आत्तापर्यंत गृहमंत्र्यांच्या पथकातील 5 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

तेलंगणातील गांधी रुग्णालयात केंद्रीय पथक भेटीसाठी आले असून प्रत्येक राज्याचा दौरा हे पथक करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर चे संयुक्त पथक सर्वाधिक कोरोनाबाधित असलेलल्या राज्यातील परिस्थिता पाहून सर्वप्रथम दौरा करत आहे. यापूर्वी केंद्रीय पथकाने मुंबई आणि अहमदाबाद येथील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, सोमवारी प्राप्त झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तेलंगणात 14 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यापैकी, सध्या 9 हजार अॅक्टीव्ह रुग्ण असून जवळपास 5 हजार रुग्णांना डिस्जार्ज मिळाला आहे. 

तेलंगणा सरकारने नुकतेच कोरोना टेस्टींगमध्ये वाढ केली असून दररोज 1 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 247 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील प्रत्येक घरातील व्यक्तींचे स्क्रिनींग करण्याचे आदेश देण्यात आले असून 90 दिवसांत ही तपासणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह'

'सलमान खानकडून सुशांतला देण्यात येत होत्या धमक्या' 

तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ 

इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
 

 

Web Title: Corona to Telangana Home Minister, excitement over attendance at public event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.