Corona Test: कोरोना झालाय की नाही, अवघ्या १५ सेकंदात कळणार; १५ ऑगस्टपासून भारतात ‘हे’ नवं तंत्रज्ञान येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:40 PM2021-07-15T17:40:40+5:302021-07-15T17:42:01+5:30

SpectraLIT - Spectral Instant Test is claimed to be the world's fastest Covid-19 test: ही कोविड टेस्ट तंत्रज्ञान आणणाऱ्या इस्त्राईल कंपनीशी भारतातील मेडिसर्किलने टायअप केलं आहे.

Corona Test: MediCircle Health launches SpectraLIT Covid-19 test in India | Corona Test: कोरोना झालाय की नाही, अवघ्या १५ सेकंदात कळणार; १५ ऑगस्टपासून भारतात ‘हे’ नवं तंत्रज्ञान येणार

Corona Test: कोरोना झालाय की नाही, अवघ्या १५ सेकंदात कळणार; १५ ऑगस्टपासून भारतात ‘हे’ नवं तंत्रज्ञान येणार

Next
ठळक मुद्देक्यूबेटमध्ये ते नमुने भरले जातात Cubet ट्रांन्सपेरेंट डिवाइस आहे. त्यात सँपल टाकून ते मशीनमध्ये टाकलं जातं.स्पेक्ट्रा लिट टेस्ट करण्यासाठी केवळ २ लोकांची गरज भासते. एक सँपल घेणारा आणि दुसरा लॅपटॉप सिस्टमला कमांड देणारा.कोरोनाच्या या टेस्टला यूरोपियन सीई IVD ने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात आयसीएमआरच्या मान्यतेसाठी आवश्यकता नाही.

नवी दिल्ली – आता कोविड टेस्ट(Corona Test) अवघ्या १५-२० सेकंदात करणं शक्य आहे. नमुने घेण्यापासून निष्कर्षापर्यंत, स्पेक्ट्रालिट असं या इस्त्रायली तंत्रज्ञानाचे नाव आहे. येत्या १५ ऑगस्टपासून भारतात प्रायोगिक तत्वावर इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यात ही चाचणी करण्यात येईल. थोडसं सलाईन पाणी आणि काही वेळ गुळणी करायची त्यानंतर ते पाणी एका कंटेनरमध्ये टाकायचं. यातील २ एमएल ट्यूबमध्ये भरून ठेवायचं. इतक्याच आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून कोरोनाचा निष्कर्ष अवघ्या १५-२० सेकंदात संगणकाच्या स्क्रीनवर दिसून येणार आहे.

ही कोविड टेस्ट तंत्रज्ञान आणणाऱ्या इस्त्राईल कंपनीशी भारतातील मेडिसर्किलने टायअप केलं आहे. मेडिसर्किलचे सहसंस्थापक डॉ. रजित शाह म्हणाले की, क्यूबेटमध्ये ते नमुने भरले जातात Cubet ट्रांन्सपेरेंट डिवाइस आहे. त्यात सँपल टाकून ते मशीनमध्ये टाकलं जातं. लॅपटॉपवर टेस्ट रन केला जातो. टेस्ट रनद्वारे फोटो Spectrametry लाईटच्या मदतीनं सँपल स्कॅन केले जाते. या स्कॅनिंगच्या आधारे सँपल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळू शकतं.

स्पेक्ट्रा लिट टेस्ट करण्यासाठी केवळ २ लोकांची गरज भासते. एक सँपल घेणारा आणि दुसरा लॅपटॉप सिस्टमला कमांड देणारा. कोरोनाच्या या टेस्टला यूरोपियन सीई IVD ने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात आयसीएमआरच्या मान्यतेसाठी आवश्यकता नाही. याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी असेल. त्यात रि एजेंटची गरज नाही. याची संसिटिविटी ९५ टक्के आणि स्पेसिफिसिटी ९३ टक्के आहे. ही टेस्ट आरटी पीसीआर(RTPCR) चाचणीच्या बरोबरता मानली जाते. नीती आयोगानेही या चाचणीचा डेमो घेतला आहे.

ईज ऑफ डूइंग बिझनेसेसचे संचालक अभिजीत सिन्हा म्हणाले की, ही चाचणी व्हेरिएंट डिटेक्ट करू शकते. मग तो कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असला तरी त्याचा शोध घेतला जाऊ शकतो. यूरोपच्या १२० एअरपोर्टवर याच माध्यमातून कोविड टेस्ट करण्यात येत आहे. कोणताही दुसरा व्हेरिएंट डिटेक्ट झाला तरी डिटेल आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या सर्वर जातो. संपूर्ण रिझल्ट प्रोसेससाठी १५ सेकंदाचा वेळ लागतो.

Web Title: Corona Test: MediCircle Health launches SpectraLIT Covid-19 test in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.