कोरोनाने पतीचा व्यवसाय ठप्प झाला, पत्नीने सुरू केलं काम; आता महिन्याला लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:18 PM2023-03-08T16:18:41+5:302023-03-08T16:22:16+5:30
आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं. अशा परिस्थितीत पत्नीने संकटाला संधी बनवून स्वयंपाकाच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले.
कोरोनाच्या काळात पतीचा व्यवसाय ठप्प झाला. आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं. अशा परिस्थितीत पत्नीने संकटाला संधी बनवून स्वयंपाकाच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. आता ती दरमहा एक लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. सेंटर पॉइंटच्या कल्पना टॉवरमध्ये राहणाऱ्या पारुल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती चेतन सचदेवा हे वेडिंग प्लॅनर आहेत.
वेडिंग प्लॅनर त्यांचा व्यवसाय कोरोनाच्या काळात ठप्प झाला. कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. खाण्यापासून ते मुलांच्या फीपर्यंत चिंता सतावू लागली. अशा परिस्थितीत त्यांनी लोकांचे मत जाणून घेतले. त्यांना स्वयंपाकाची आवड होती. त्याच छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याचें ठरवलं आणि संकटात संधी मिळाली. पारुल यांनी होममेड फूड आयटेम्सच्या नावाने उत्पादनांसह बाजारात प्रवेश केला. त्यांचा व्यवसाय काही वेळात सुरू झाला.
दरमहा एक लाखाहून अधिक कमाई होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आज त्यांच्या नावाने व्यवसाय ओळखला जातो. Zomato आणि Swaggy यांनी त्यांच्याशी करार केला. पारुल यांनी सांगितले की, मुलगी प्रियांका सचदेवा ही अकरावीत शिकत आहे. लहान मुलगी जसमीत सचदेवा स्वयंपाकाच्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचवते, तर वडील नरेश नागपाल पॅकेट्स कसे असावेत याची माहिती देतात.
"वडिलांनी स्वयंपाक करायला शिकवलं"
पारुल सचदेवाने यांनी सांगितलं की त्यांनी वडील नरेश नागपाल यांच्याकडून स्वयंपाक शिकल्या. वडील दर रविवारी स्वतः स्वयंपाक करायचे. ते व्हेज आणि नॉनव्हेज बनवायला शिकवायचे. माझ्या वडिलांनी मला जे शिकवले तेच आता काम म्हणून मी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"