Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:41 AM2021-05-23T08:41:27+5:302021-05-23T08:42:00+5:30

Corona vaccination in India: एप्रिल महिन्यात लसीकरणाने ३० लाख डोस प्रतिदिन हा उच्चांक गाठला होता. २२ मेपर्यंत लसीकरणाचा वेग प्रतिदिन १७ लाख २७ हजारापर्यंत खाली आला आहे.

Corona vaccination: 1 crore daily dose, only then the goal can be achieved .... | Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

Next

- हरिश गुप्ता 
नवी दिल्ली : देशातली कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे अजून दृष्टिपथात नसली तरी लसीकरणाचा वेग मात्र मंदावल्याचे चित्र आहे. १८ वर्षे वयापुढील तब्बल ९४ कोटी नागरिकांचे डिसेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट गाठायचे असल्यास देशाला प्रतिदिन १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे. 
एप्रिल महिन्यात लसीकरणाने ३० लाख डोस प्रतिदिन हा उच्चांक गाठला होता. २२ मेपर्यंत लसीकरणाचा वेग प्रतिदिन १७ लाख २७ हजारापर्यंत खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोस तयार असतील, अशी ग्वाही दिली. स्पुतनिक व्ही, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा आणि नोवाव्हॅक्स या लसीही देशात येणार असल्याचे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले. लोकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या असताना त्यावर केंद्र सरकारने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 

लसीकरणाचे गणित
देशात १८ वर्षे वयापुढील एकूण ९४ कोटी नागरिक. 
सर्वांचे डिसेंबरर्यंत लसीकरण करायचे झाल्यास १ कोटी डोस प्रतिदिन असे लक्ष्य ठेवावे लागेल. 
त्यासाठी १७० कोटी डोसची आवश्यकता आहे. येत्या १७५ ते १८० दिवसांत लसीकरणाची मोहीम फत्ते करावी लागेल. 
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचे २२ मे रोजी १२७ दिवस पूर्ण झाले. १९ कोटी ३० लाख जणांचे लसीकरण झाले. 

Web Title: Corona vaccination: 1 crore daily dose, only then the goal can be achieved ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.