Corona Vaccination : ८५ दिवसांमध्ये झाले १० कोटी लसीकरण; लस उत्सवाची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 04:12 AM2021-04-11T04:12:56+5:302021-04-11T07:05:14+5:30

Corona Vaccination : नववर्षाच्या प्रारंभी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला ८५ दिवस पूर्ण झाले असून, आतापर्यंत देशभरातील १० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

Corona Vaccination: 100 million vaccinations in 85 days; Preparations for the vaccination festival | Corona Vaccination : ८५ दिवसांमध्ये झाले १० कोटी लसीकरण; लस उत्सवाची तयारी 

Corona Vaccination : ८५ दिवसांमध्ये झाले १० कोटी लसीकरण; लस उत्सवाची तयारी 

Next

- एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने आपले हातपाय पसरत असतानाच कोरोनाला थोपविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. नववर्षाच्या प्रारंभी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला ८५ दिवस पूर्ण झाले असून, आतापर्यंत देशभरातील १० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. 

लस उत्सवाची तयारी 
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार देशातील सर्व राज्यांत ११ ते १४ एप्रिल काळात लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे. रविवारी महात्मा फुले यांची आणि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे या काळात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले होते. 

मोदींच्या आवाहनानंतर काही राज्यांनी पकडला जोर
लस उत्सवासाठी प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनी विशेष तयारी केली आहे. भाजपशासित राज्यांमध्ये मिळूनच चार दिवसांत दोन ते तीन कोटी लोकांना लस देण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Corona Vaccination: 100 million vaccinations in 85 days; Preparations for the vaccination festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.