Corona vaccination: लसीकरणानंतरही झाला तब्बल एवढ्या लोकांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची हायकोर्टात धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:51 PM2021-06-08T15:51:40+5:302021-06-08T15:59:34+5:30

Corona vaccination in India: कोरोना लसीकरणानंतर झालेल्या मृत्यूंबाबतची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई हायकोर्टात दिली आहे.

Corona vaccination: 475 people die even after vaccination, shocking information from Union Health Ministry in High Court | Corona vaccination: लसीकरणानंतरही झाला तब्बल एवढ्या लोकांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची हायकोर्टात धक्कादायक माहिती

Corona vaccination: लसीकरणानंतरही झाला तब्बल एवढ्या लोकांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची हायकोर्टात धक्कादायक माहिती

Next

नवी दिल्ली - देशात गेल्या तीन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेली कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. तसेच आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठीची तयारीही सुरू झाली आहे. (Corona vaccination) दरम्यान, कोरोना लसीकरणानंतर झालेल्या मृत्यूंबाबतची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई हायकोर्टात दिली आहे. (475 people die even after vaccination, shocking information from Union Health Ministry in High Court) 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २८ मे पर्यंत कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने न्यायालयात याबाबत एक १४ पानांचे शपथपत्र दाखल केले आहे. केंद्र सरकारने या शपथपत्रात सांगितले की, घरोघरी जाऊन लसीकरण करण्यापेक्षा घराजवळील केंद्रावर लसीकरण करणे चांगले ठरेल. कोरोनाविरोधातली लस व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय तज्ज्ञ समूह (NEGVAC) ने हायकोर्टाचा याबाबतचा आदेश पाहिला होता. NEGVACने २५ मे २०२१ रोजी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली होती. 

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार NEGVAC च्या बैठकीत सर्वसंमतीतून सहमती व्यक्त करण्यात आली. अनेक जोखिमांमुळे कोरोनाचे लसीकरण घरोघरी जाऊन करता येणार नाही. मात्र दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जे चालू फिरू शकत नाहीत. त्यांना आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा उपाययोजना करून लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा वाढवण्याची गरज आहे.  

शपथपत्रात सांगण्यात आले की,  (NEGVAC) च्या या निर्णयानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निअर होम कोविड लसीकरण केंद्रासंबंधीची एक एसओपी तयार केली आहे. तिला वेबसाईटवर प्रकाशित केले आहे. शपथपत्रामध्ये सांगितले की, शपथपत्रामध्ये सांगण्यात आले की, नियर टू होम रणनीतीमध्ये घराजवळ लोकांना लस देता येऊ शकेल.  

NEGVAC च्या सूचनांमध्ये सांगण्यात आले की, निअर टू होम व्हॅक्सिनेशन सेंटरची जबाबदारी जिल्हा आणि शहरी प्रशासनाची असेल. लाभार्थी एक तर कोविन अॅपच्या माध्यमातून किंवा थेट लसीकरण केंद्रात जाऊन नोंद करू शकतो. कुठल्याही प्रतिकूल घटनेच्या व्यवस्थापनासाठी लसीकरण केंद्रावर आवश्यक वाहन तैनात केले गेले पाहिजे. त्यामुळे लोकांना त्वरित मेडिकल मदत मिळू शकेल.  

Web Title: Corona vaccination: 475 people die even after vaccination, shocking information from Union Health Ministry in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.