Corona Vaccination: ४० वर्षे वयावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता, इन्साकॉगची केंद्र सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 08:24 AM2021-12-04T08:24:19+5:302021-12-04T08:24:47+5:30

Corona Vaccination: ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आली आहे.

Corona Vaccination: Booster Dose Given to Citizens Over 40, INSACOG Recommends to Central Government | Corona Vaccination: ४० वर्षे वयावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता, इन्साकॉगची केंद्र सरकारला शिफारस

Corona Vaccination: ४० वर्षे वयावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता, इन्साकॉगची केंद्र सरकारला शिफारस

Next

नवी दिल्ली : ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आली आहे. अशा बूस्टर डोससंदर्भातील शिफारस इन्साकॉगने केंद्र सरकारला केली आहे.

ज्यांनी आजवर लस घेतलेली नाही, त्यांना ओमायक्राॅनच्या संसर्गाचा धोका आहे याची जाणीवही इन्साकॉगने करून दिली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या लसींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज् या नव्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शक्यता आहे. मात्र नव्या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची तीव्रता मात्र पूर्वीच्या विषाणूंच्या तुलनेत कमी असू शकेल.

ओमायक्रॉनमुळे सर्वाधिक धोका ४० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या लोकांना असल्याने त्यांना बूस्टर डोस देण्यात यावेत, असे इन्साकॉगचे मत आहे. या नव्या विषाणूचे अस्तित्व लवकर शोधून काढण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे शक्य होईल. 

जोखमीच्या देशांतून आलेल्यांपैकी१८ जण बाधित
- कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची जोखीम असलेल्या देशांमधून भारतात आजवर आलेल्या १६ हजार प्रवाशांपैकी १८ जण कोरोनाबाधित आहेत. 
_ या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. 
- ते म्हणाले, ओमायक्राॅनचा विषाणू शोधण्यासाठी या प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावरून विरोधकांनी सुरू केलेले राजकारण आता थांबवावे, असेही आवाहन मांडवीय यांनी केले. 

Web Title: Corona Vaccination: Booster Dose Given to Citizens Over 40, INSACOG Recommends to Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.