Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:56 PM2021-05-31T15:56:36+5:302021-05-31T16:05:55+5:30
Corona Vaccination : सध्या ही योजना राबविण्यासाठी सरकार दरमहा 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.
नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अनेक राज्यांतील लसींची कमतरता लक्षात घेता 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सध्या थांबविण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना लस देण्याचा विचार करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून हे शक्य आहे. सध्या ही योजना राबविण्यासाठी सरकार दरमहा 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. (central govt target 1 crore corona vaccination daily)
येत्या काही महिन्यांत सरकारला कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 कोटी डोस मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. याशिवाय स्पुटनिक व्ही आणि इतर लसींवरही सरकार लक्ष ठेवून आहे. तसेच, सरकार आणखी काही परदेशी लसींना ग्रीन सिग्नल देण्याची शक्यता आहे. प्रत्येक लसी केंद्रात दररोज 100 ते 150 लोकांना लस देण्याची योजना आहे.
या निर्णयामुळे तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि अतिरिक्त आयातीवरील अवलंबन कमी होईल, असे सरकारला वाटते. #farmers#NarendraModihttps://t.co/UlJRT7cyPU
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
दोन वेगवेगळ्या लसींचे मिश्रण कोरोनावर मात करण्यास अधिक प्रभावी सिद्ध होते की नाही याचा भारतीय शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. भारतात लवकरच चाचण्या केल्या जातील. या प्रयोगात सध्या भारतात वापरल्या जाणार्या सर्व लसींचा समावेश आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे डोस लोकांना दिले जाऊ शकतात.
('राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत', रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला)
येणार्या काळात कोविशील्ड लसीचा एकच डोस दिला जाणार आहे. हा एकच डोस व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुतनिक लाइट आणि कोविशिल्ट लस एकाच प्रोसेसपासून बनविल्या आहेत. जॉन्सन आणि जॉन्सन आणि स्पुतनिक लाइट एक डोससाठी लस आहेत.