Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:18 PM2022-03-14T14:18:45+5:302022-03-14T14:19:50+5:30

Corona Vaccination for above 12 years: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

Corona Vaccination: Corona vaccination of 12-14-year-olds and 'precaution dose' for all those above 60 years from 16 march 2022 | Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस

Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस

Next

केंद्र सरकारने १४ वर्षे वयापुढील मुले आणि नागरिकांना लस देण्याचा टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला होता. यामुळे कोरोनाची तिसरी लाट फार काळ तग धरू शकली नाही. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत केंद्राने १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. यासह, 60 वर्षांवरील सर्व लोकांना आता बूस्टर डोस मिळणार आहे. 


या आधी तिसऱ्या लाटेत काही नागरिकांनाच बुस्टर डोस दिला जात होता. आता सर्व ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. याचबरोबर या आधी १४ ते १८ वयोगटाच्या मुलांना कोरोना लस देण्यात येत होती. आता याचा विस्तार करण्यात आला असून १२ ते १४ वयाच्या मुलांनाही लस दिली जाणार आहे. 

Web Title: Corona Vaccination: Corona vaccination of 12-14-year-olds and 'precaution dose' for all those above 60 years from 16 march 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.