Corona Vaccination : लसीकरणात मिळणार परदेशी लसींचे शस्त्र, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:55 AM2021-04-14T03:55:54+5:302021-04-14T07:21:56+5:30
Corona Vaccination : अमेरिका, ब्रिटन, जपान या देशांमध्ये तसेच जागतिक आराेग्य संघटनेच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसींना भारतातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, असे या समितीने म्हटले हाेते.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : इतर देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या काेराेना लसींना भारतातही तशी सशर्त परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
अमेरिका, ब्रिटन, जपान या देशांमध्ये तसेच जागतिक आराेग्य संघटनेच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसींना भारतातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, असे या समितीने म्हटले हाेते. त्यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. या कंपन्यांना देशात समांतर क्लिनिकल ट्रायल करावे लागणार आहे.
एका दिवसात ८७९ मृत्यू
२४ तासांत देशात १ लाख ६१ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८७९ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे.