Corona vaccination : दोन डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित न झाल्यास पुन्हा लस घ्यावी लागणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:02 IST2021-09-04T14:02:12+5:302021-09-04T14:02:47+5:30
Corona vaccination Update: कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही पुरेशा अँटीबॉडी विकसित झालेल्या दिसत नसतील तर पुन्हा लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Corona vaccination : दोन डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित न झाल्यास पुन्हा लस घ्यावी लागणार? जाणून घ्या...
नवी दिल्ली - भारतामध्ये सध्या कोरोना लसीकरण अभियान जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये दररोज एक कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लस दिली जात आहे.(Corona vaccination) मात्र लसीकरणानंतर अनेक जणांनी अँटीबॉडीची तपासणी केली असता लसीकरणानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आता कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही पुरेशा अँटीबॉडी विकसित झालेल्या दिसत नसतील तर पुन्हा लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. (If antibodies do not develop even after taking two doses, will I have to be vaccinated again? Find out)
याबाबत आरोग्यविषयक तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकामध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत एका लसीमुळे अँटीबॉडी तयार होत नसेल तर कुठली दुसरी लस घ्यावी का, असे लोकांकडून विचारले जात आहेत. याबाबत जोधपूरमधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एनआयआयआरएनसीडीचे संचालक आणि कम्युनिटी मेडिसिनचे तज्ज्ञ डॉ. अरुण शर्मा यांनी सांगितले की, जर तुम्ही लस घेतली आणि तरीही अँटीबॉडी विकसित झाली नाही तर याचा अर्थ काही ना काही गडबड आहे. मात्र लस घेतल्यानंतर अँटीबॉडी टायटल्सचा स्तर कमी असला तरी याचा अर्थ पुन्हा लस घ्यायची गरज आहे, असा होत नाही.
डॉ. शर्मा सांगतात की, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी अँटीबॉडी का विकसित झाली नाही, याचा शोध घेतला पाहिजे. शरीरामध्ये काही जेनेटिक कंपोझिशन आहे का या संबंधीचे काही अडथळे आहेत जे अँटीबॉडी विकसित होण्यापासून रोखत आहेत हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे लस घेतल्यावरही अँटीबॉडी तयार होत नसेल तर सर्वप्रथम त्यामागचे कारण तपासले पाहिजे. त्यासाठी इम्युनोलॉजिस्टशी संपर्क केल्यानंतर पॅथॉलॉजिस्टकडून संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे.
ते सांगतात की कोरोनामध्ये आपण शरीरामध्ये ह्युमोरल अँटीबॉडी पाहतो. ह्युमोरल इम्युनिटीला समजण्यासाठी टी सेल्स दोन प्रकारच्या असतात हे जाणून घेतले पाहिजे. एक टी सेपरेशर सेल्स असते. आणि दुसरी टी हेल्पर सेल्स असते. टी हेल्पर सेल्स असते. टी हेल्पर सेल्स कोरोना विषाणूला ओळखण्याचे काम करते. तसेच विषाणूचा हल्ला झाल्यास त्याला ओळखते.