Coronavirus : उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचंही होणार लसीकरण; पाहा सेंटर्सवर कसं करता येईल रजिस्ट्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:34 AM2021-03-31T08:34:52+5:302021-03-31T08:37:26+5:30
१ एप्रिलपासून ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार कोरोनाची लस, प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी महाराष्ट्राकडून विनंतीच केली नसल्याची आरोग्य सचिवांची माहिती
Covid-19 Vaccination India: काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर १ एप्रिल पासून सरकारनं ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परंतु ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची नसेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी ३ वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल. तसंच पासबूक, पासपोर्ट, रेशन कार्डदेखील ओळखपत्र म्हणून दाखवू शकता, असं केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण म्हणाले.
आतापर्यंत देशात ८०७ युके व्हेरिअंट्स, ४७ साऊथ आफ्रिकन व्हेरिअंट्स आणि १ ब्राझिलियन व्हेरिअंट दिसून आले असल्याचं आर. भूषण म्हणाले. पॉझिटिव्ह रेटच्या साप्ताहिक राष्ट्रीय सरासरीबाबत सांगायचं झालं तर तो ५.६५ टक्के आहे. महाराष्ट्रात तो २३ टक्के आणि पंजाबमध्ये ८.८२ टक्के इतका आहे. याशिवाय छत्तीसगढमध्ये ८ टक्के, मध्यप्रदेशात ७.८२ टक्के. तामिळनाडूत २.५० टक्के. कर्नाटकात २.५४ टक्के, गुजरातमध्ये २.२ टक्के आणि दिल्लीतर २.०४ टक्के इतका आहे. या राज्याना कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यास सांगितलं असल्याची माहितीदेखील भूषण यांनी दिली. "होम क्वारंटाईन बद्दल पाहताना त्याचं पालन केलं जातंय का नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं गेलं पाहिजे," असंही ते म्हणाले.
From April 1 all people above 45 yrs of age will be eligible for vaccination. Advance appointment can be booked through https://t.co/30GkxdeSKw. If you don't want to do this, you can go to your nearest vaccination centre after 3 pm & go for on-site registration: Union Health Secy pic.twitter.com/Y2Aul3kCJ5
— ANI (@ANI) March 30, 2021
प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी विनंतीच नाही
महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.