Corona vaccination : ...तर कोरोनाच्या लसीचा प्रभाव होऊ शकतो कमी, एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:45 PM2021-04-19T16:45:34+5:302021-04-19T16:50:08+5:30
Corona vaccination in India : काही कारणांमुळे कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव कमी होऊ शकतो, अशी भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (Corona vaccination ) काल दिवसभरात देशामध्ये २.७० लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या जगातील इतर भागांप्रमाणेच भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. मात्र काही कारणांमुळे कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव कमी होऊ शकतो, अशी भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. (... so the effects of coronavirus vaccine may be less, warns AIIMS director Dr R. Guleria)
गुलेरिया म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी दोन उपाय महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे औषध आणि औषध देण्याची वेळ. जर तुम्ही औषध लवकर दिले किंवा उशिरा दिले तर त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. अनेक औषधांना एकत्र करून दिल्यास अशा प्रकारामुळे रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
In last 1 year of COVID management, we have learnt that 2 things are most important – drugs & timing of drugs. If you give them too early/late, it would cause harm. Giving cocktail of drugs on day 1 can kill your patient & would be more harmful: AIIMS Director Dr. Randeep Guleria pic.twitter.com/4YeY7VRFCt
— ANI (@ANI) April 19, 2021
कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देणे फायदेशीर असल्याचे रिकव्हरी ट्रायलमधून दिसून आले आहे. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी होण्यापूर्वी स्टेरॉइड दिल्याच त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. तसेच वेळेआधीच स्टेरॉइड देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर अधिक असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये भारतात कोरोनाच्या २ लाख ७३ हजार ८१० नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ व पोहोचली आहे. दर दिवसभरात १ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ७८ हजार ७६९ झाला आहे. सध्या देशभरात १९ लाख २९ हजार ३२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.