मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:19 PM2021-05-13T12:19:42+5:302021-05-13T12:20:15+5:30

Wait 12-16 weeks to take 2nd Covishield jab: आधी 30 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगणाऱ्या सरकारने नंतर हा कालावधी 45 दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढणार आहे.

Corona Vaccination: interval of the second dose of Covishield will increase by 12-16 weeks; Advice of the Committee | मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला

मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला

Next

dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी 30 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगणाऱ्या सरकारने नंतर हा कालावधी 45 दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढणार आहे. (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.)


Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय? पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का? काय म्हणतात तज्ज्ञ....

केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली आहे. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आले आहे. सध्या कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचे करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे. 


CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या पॅनेलने म्हटले आहे. अशा लोकांनी बरे झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असे या NTAGI ने सुचविले आहे. प्रेग्नंट असलेल्या महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसेच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे या पॅनेलने म्हटले आहे. 


ब्रिटन, कॅनडामध्ये किती आहे कालावधी?
कोव्हॅक्सिन बनविणाऱ्या आयसीएमआरने 28 दिवसांचे अंतर ठेवण्यास सांगितले होते. मात्र, त्यापुढील दोन डोसमधील अंतरावर डेटा उपलब्ध नाही. तर कोव्हिशिल्ड वापरणाऱ्या ब्रिटनने दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे ठेवले आहे. कॅनडने हेच अंतर 16 आठवड्यांचे ठेवले आहे.

Read in English

Web Title: Corona Vaccination: interval of the second dose of Covishield will increase by 12-16 weeks; Advice of the Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.