Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:29 AM2021-06-03T06:29:06+5:302021-06-03T06:29:31+5:30

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे.

Corona Vaccination Kolkata tops in metro cities | Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील लसीकरणात कोलकाता शहराची प्रगती इतर महानगराच्या तुलनेत चांगली आहे. कोलकाताच्या लोकसंख्येत ३१ टक्के टक्क्यांना पहिली तर ११ टक्क्यांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे. ५.१३ लाख लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. ही संख्या ४५ लाख लोकसंख्येच्या ११.४३ टक्के आहे.

सात राज्याच्या राजधानीतील लसीकरणात बंगळुरू दुसरे आहे. तेथे जवळपास एक कोटी लोकसंख्येत ३७.१४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात २९.७७ लाख (लोकसंख्येच्या ३१.०५ टक्के) पहिली मात्रा आहे. ७.३७ लाख लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे.

७२.१ लाख लोकसंख्येच्या अहमदाबादेत २४.३७ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १९.४३ लाख जणांना पहिली तर, ४.९३ लाख जणांना दुसरी मात्रा दिली गेली आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी दुपारपर्यंत लसीची ३४.४९ लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. त्यात २६.८३ लाख पहिली मात्रा होती. दोन्ही मात्रा मिळालेली संख्या ७.६६ लाख. प्रत्येक चौथ्या-पाचव्या व्यक्तीला पहिली तर १४ व्या मुंबईकराला लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. चेन्नईत एकूण २०.८ लाख लस मात्रा दिल्या गेल्या. त्यात १५.१९ लाख पहिली तर, ५.६१ लाख लोकांना दुसरी मात्रा दिली गेली. 

Web Title: Corona Vaccination Kolkata tops in metro cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.