Corona Vaccination: हद्दच झाली राव! कोरोना लस घेतलीच नाही अन् सर्टिफिकेट घरी पोहचलं; धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:09 PM2021-05-08T12:09:03+5:302021-05-08T12:10:28+5:30

काश्मीरात काही लोकांना लस दिली नसतानाही त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Corona Vaccination: Many People Were Issued Certificates In Srinagar Without Getting Vaccinated | Corona Vaccination: हद्दच झाली राव! कोरोना लस घेतलीच नाही अन् सर्टिफिकेट घरी पोहचलं; धक्कादायक प्रकार उघड

Corona Vaccination: हद्दच झाली राव! कोरोना लस घेतलीच नाही अन् सर्टिफिकेट घरी पोहचलं; धक्कादायक प्रकार उघड

Next
ठळक मुद्देपीडीपी नेते डॉ. हरबक्श सिंह यांच्याबाबत हे घडल्यानं पहिल्यांदा हे सगळ्यांसमोर आलं. एका दाम्पत्याने कोविन वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केले होते. मात्र कोणतीही लस न घेता या दाम्पत्यांना सर्टिफिकेट जारी करण्यात आलं आहे.जेव्हा मी माझ्या आई वडिलांना विचारलं तेव्हा ते घरातच असल्याचं समजलं

जम्मू – देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे. काश्मीरमध्येही लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेकांनी लसीचे २ डोस दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. परंतु आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आल्यानं लोकांमध्ये खळबळ माजली आहे.

काश्मीरात काही लोकांना लस दिली नसतानाही त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पीडीपी नेते डॉ. हरबक्श सिंह यांच्याबाबत हे घडल्यानं पहिल्यांदा हे सगळ्यांसमोर आलं. काश्मीरातील निशात ब्रेन परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी एका दाम्पत्याने कोविन वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केले होते. मात्र कोणतीही लस न घेता या दाम्पत्यांना सर्टिफिकेट जारी करण्यात आलं आहे.

या दाम्पत्याने सांगितले की, आम्ही लस घेण्यासाठी ब्रेन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहचलो होतो. तेव्हा लस घेण्यापूर्वीच आम्हाला एसएमएस आला त्यात आम्ही लसीचा पहिला डोस घेतल्याचं म्हटलं होतं. हे एकच प्रकरण नव्हतं तर आणखी एक प्रकार समोर आला. एका युवतीने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं होतं की, मी माझ्या वृद्ध आईवडिलांपासून दूर राहते. आईवडिलांना लस घेण्यासाठी मी वेबसाईटवर जाऊन नोंदणी केली. त्यांचे लसीकरण ५ मे रोजी होणार होतं. परंतु १२ वाजून १३ मिनिटांनी त्यांना मेसेज आला की, त्यांचे लसीकरण पीएचसी नौगाम येथे होणार आहे. तर २० मिनिटांनी पुन्हा एसएमएस आला त्यात पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात आलं.

या युवतीने सांगितले की, जेव्हा मी माझ्या आई वडिलांना विचारलं तेव्हा ते घरातच असल्याचं समजलं. असे अनेक प्रकार समोर आलेत. पण या धक्कादायक प्रकरणावर कोणीही काहीही बोलायला तयार नाहीत. याच दरम्यान सूत्रांनी माहिती दिली की, जास्तीत जास्त लोक लसीकरण केंद्रावर येत असल्याने डेटा ऑपरेटरकडून नजरचुकीने अशी चूक होत आहे. ती १०७५ या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून ठीक केली जाऊ शकते.

Web Title: Corona Vaccination: Many People Were Issued Certificates In Srinagar Without Getting Vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.