Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:46 AM2021-06-24T10:46:11+5:302021-06-24T10:46:55+5:30

Corona Vaccination : विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी सर्व आमदारांना पावसाळी अधिवेशनापूर्वी सहकुटुंबीयांसमेवर कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन केले आहे.

Corona Vaccination: mlas who do not get vaccine will not get entry in bihar assembly | Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

googlenewsNext

पटना :  फक्त कोरोना लसीचा डोस घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत प्रवेश दिला जाईल. यासंदर्भाक विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी नवीन फर्मान जारी केले आहे. बिहारमध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीचा डोस न घेतलेल्या आमदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (mlas who do not get vaccine will not get entry in bihar assembly)

विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना मोठी समस्या उद्भवू शकते. कारण, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी अद्याप लस घेतलेली नाही. दरम्यान, कोरोनावरील ही लस घेणारा आपण अखेरचा व्यक्ती असणार आहे,असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. तसेच, सर्वात आधी सर्वसामान्यांना लसी द्यावी, अशी त्यांची विचारसरणी आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी सर्व आमदारांना पावसाळी अधिवेशनापूर्वी सहकुटुंबीयांसमेवर कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आपल्या मतदार संघातील लोकांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या आमदारांच्या सौजन्याने त्यांच्या क्षेत्रातील 80 टक्के पेक्षा जास्त लोकांनी लस घेतल्या असतीतल, त्यांचा विधानसभेद्वारे सन्मान केला जाईल, असे विजय कुमार सिन्हा म्हणाले.

याचबरोबर, विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा म्हणाले की, लस ही कोरोनाविरोधात सर्वोत्तम सुरक्षा कवच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असल्याने आपली जबाबदारी वाढते. लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांद्वारे जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल.

याशिवाय, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, आपण सावध आणि सावधगिरी बाळगली पाहिजे, आपल्याला या अदृश्य व्हायरसविरोधात लढावे लागेल आणि मौल्यवान आयुष्य सुरक्षित ठेवावे लागेल, असे विजय कुमार सिन्हा म्हणाले.

Read in English

Web Title: Corona Vaccination: mlas who do not get vaccine will not get entry in bihar assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.