Corona Vaccination: 'देशात एवढ्या लवकर लसीकरण होणे, पंतप्रधानांची दूरदृष्टी'; अदर पूनावालांकडून नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:29 PM2021-10-21T18:29:26+5:302021-10-21T18:30:19+5:30
अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
नवी दिल्ली - देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींवर पहोचला आहे. याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदृष्टीला जाते, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. याच वेळी, ज्यांनी आपला नंबर येऊनही दुसरा डोस घेतला नाही, अशा लोकांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
भारतात 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाली. या अंतर्गत 18 वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. देशात 18 वर्षांवरील लोकसंख्या सुमारे 94 कोटी एवढी आहे. या लोकसंख्येच्या 75% लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर या लोकसंख्येच्या 30% लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व वयस्क नागरिकांना म्हणजेच 94 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, लोकांना दुसरा डोसही लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
95% जनतेला मोफत लस -
देशातील सुमारे 95% जनतेला मोफत लस देण्यात आली आहे. 7 बिलियन लोकसंख्या असलेल्या जगात 1 बिलियन डोस एकट्या भारतात दिले गेले आहेत. गेल्या जुलै महिन्यात देशात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मुलांचे लसीकरण अद्याप विचाराधीन आहे. निरोगी मुलांमध्ये लसीकरण पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होऊ शकते.
हेही वाचा -
- 100 कोटी डोस! सीरमशिवाय अशक्यप्राय होते, पुनावालांनी 5 लाखांत सुरु केली होती कंपनी
- भारतात फक्त 50 दिवसांतच टोचले गेले कोरोना लसीचे 44 कोटी डोस; जाणून घ्या, 10 मोठे टप्पे