Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:03 AM2021-06-02T10:03:09+5:302021-06-02T10:05:16+5:30

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोवॅक्सिनला अजून मान्यता नाही

Corona Vaccination Students who were vaccinated with covaxin got into trouble | Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत

Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत

Next

नवी दिल्ली : विदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली खरी. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तिला अजून मान्यता दिलेली नाही. यामुळे आपण अमेरिका आणि इंग्लंडमध्ये प्रवास करण्यास पात्र ठरणार की नाही, अशी द्विधा मनस्थिती अनेकांची झाली आहे. 

या विद्यार्थ्यांपैकी काही जण हे बारावीचे असून, त्यांनी लवकरच आपल्याला बोर्डची परीक्षा द्यायची आहे, असा विचार करून घाईघाईत ही लस घेतली. स्प्रिंगलडेल्सची खुशी जैन हिने गेल्या आठवड्यात कोव्हॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेतली. ती म्हणाली, माझे पालक माझ्या सुरक्षितेवरून काळजीत होते. सीबीएसई परीक्षा देण्यास मी शारीरिकदृष्ट्या सक्षमही असायला हवे, ही वस्तुस्थिती होती. पहिली मात्रा घेतल्यानंतर तिला हे समजले 

Web Title: Corona Vaccination Students who were vaccinated with covaxin got into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.