उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीला लसीकरणाला सुरुवात?, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संकेत
By मोरेश्वर येरम | Published: January 2, 2021 04:54 PM2021-01-02T16:54:23+5:302021-01-02T16:56:02+5:30
मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस देण्याची मोहीम उत्तर प्रदेशात सुरू होऊ शकते
लखनऊ
उत्तर प्रदेशातील नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस देण्याची मोहीम उत्तर प्रदेशात सुरू होऊ शकते, असे संकेत खुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
गोरखपुर जिल्ह्यात एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या कोरोनामुळे खूप वाईट परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारताने कोरोनाविरोधात जबरदस्त लढा दिला आहे आणि यात यश प्राप्त झालं आहे, असं योगी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील एकूण ६ जिल्ह्यांमध्ये सध्या लशीकरणाचे 'ड्राय रन' सुरू असून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील जनतेला कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू केली जाऊ शकते, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हास्तरीय तयारीपासून सर्व पातळीवरी आढावा घेत असल्याचं योगी म्हणाले. याशिवाय, लशीच्या साठवणुकीसाठी 'कोल्डचेन'ची यंत्रणा तयार केली जात असल्याचंही ते म्हणाले.