Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:26 AM2021-06-16T09:26:58+5:302021-06-16T09:53:36+5:30

Corona Vaccination: कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सरकारनं परस्पर घेतल्याची चर्चा

Corona Vaccination We didnt back doubling of vaccine dosing gap says Scientists | Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

googlenewsNext

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र लसींची टंचाई जाणवत असल्यानं लसीकरणाला गती देण्यात अडथळे येत आहेत. लसींचा तुटवडा जाणवत असतानाच सरकारनं महिन्याभरापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेऊन घेण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचं पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १३ मे रोजी घेतला. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती आणि लसींचा साठा कमी होता.

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) शिफारशीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र अशा प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं एनटीएजीआयच्या पॅनलमधील १४ पैकी ३ सदस्यांनी सांगितलं आहे.

'जागतिक आरोग्य संघटनेनं दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवडे करण्याचा सल्ला दिला. एनटीएजीआयनं या सल्ल्याची शिफारस केली. मात्र दोन लसींमधला कालावधी १२ आठवड्यांहून अधिक असावा असं एनटीएजीआयनं सुचवलं नव्हतं,' अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी दिली. 'आम्ही ८ ते १२ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. पण ते १२ ते १६ आठवड्यांचा निर्णय सरकारनं घेतला. हा निर्णय योग्य असू शकतो किंवा मग तो अयोग्यदेखील असू शकतो. आमच्याकडे त्याबद्दलचा तपशील उपलब्ध नाही,' असं गुप्ते यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या दाव्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पब्लिक हेल्थ इंग्लंड या ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या एजन्सीनं काही आकडेवारी प्रसिद्ध केली. लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवल्यास तिची परिणामकारकता ६५ ते ८८ टक्के असते, असं त्यांच्या संशोधनातून समोर आलं होतं. लसींच्या डोसमधील अंतर १२ आठवड्यांचे ठेवून ब्रिटन कोरोना संकटातून बाहेर आला. प्रत्येकाला १२ आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस मिळतोच असं नाही. त्यामुळे दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला गेला, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.

Read in English

Web Title: Corona Vaccination We didnt back doubling of vaccine dosing gap says Scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.