Corona vaccination: त्या वॉर्डबॉयचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 01:14 PM2021-01-18T13:14:10+5:302021-01-18T13:16:34+5:30

मुरादाबाद ( उत्तर प्रदेश ) - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबात ...

Corona vaccination: What exactly caused the death of that wardenboy? Information came to light from the postmortem | Corona vaccination: त्या वॉर्डबॉयचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

Corona vaccination: त्या वॉर्डबॉयचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील मुरादाबात जिल्ह्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा रविवारी तब्येत बिघडून झाला होता मृत्यू या वॉर्डबॉयच्या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होताया वॉर्डबॉयचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबात जिल्ह्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा रविवारी तब्येत बिघडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून या वॉर्डबॉयच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा झाला आहे. या वॉर्डबॉयचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

महिपाल सिंह असे या ४६ वर्षीय वॉर्डबॉयचे नाव असून, त्यांना १६ जानेवारी रोजी कोरोनावरील लस देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिपाल सिंह यांचा मृत्यू कोरोनावरील लसीमुळे झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान, हे आरोप फेटाळताना मुख्य आरोग्य अधिकारी एमसी गर्ग यांनी महिपाल यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण हे हृदयविकार असल्याचे म्हटले आहे.


जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांनीही महिपाल सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले. तसेच महिपाल यांच्या मृत्यूनंतर लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी ताकीद यांनी दिली आहे. महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर ते घरी गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, लस देण्यापूर्वी महिपाल यांची वैद्यकीय चाचणीही केली गेली नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

याबाबत सीएमओने सांगितले की, लसीकरण अभियानामध्ये मुरादाबादमध्ये ४७९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

 

Web Title: Corona vaccination: What exactly caused the death of that wardenboy? Information came to light from the postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.