Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 01:11 PM2021-05-31T13:11:18+5:302021-05-31T13:12:02+5:30
Corona vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोना विषाणूची साथ आता काहीशी उतरणीला लागली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट होऊन ती दीड लाखांपर्यंत खाली आली आहे. (Corona vaccination In India) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (When will all citizens of the country be vaccinated? The date stated by the Central Government in the Supreme Court)
या माहितीमधून केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण कधीपर्यंत होईल, याचे उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण होईल, अशी अपेक्षा आहे. लसीकरण धोरणामुळे सध्या केंद्र सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे.
भारतात मे महिन्यात कोरोनाच्या विरोधातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, काल देशात ३१ लाख ६४ हजार १६९ लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण २१ कोटी २० लाख ६६ हजार ६१४ जणांचे लसीकरण झाले आहे.
दरम्यान, काल दिवसभरात भारतात कोरोनाचे १ लाख ५२ हजार ७३४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला.