Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:02 AM2021-10-07T08:02:34+5:302021-10-07T08:03:13+5:30
लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले
एकीकडे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना सुरुवात झाली असताना लहान मुलांवरील लसीच्या बाबतीतही शुभवर्तमान आहे. झायकोव्ह-डी या कोरोनाप्रतिबंधक लसीच्या चाचण्या सध्या लहान मुलांवर सुरू असून त्यात लहान मुलांवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लसीचे तीन डोस
झायकोव्ह-डी लसीचे तीन डोस देण्यात येतात.
चाचण्यांचे निष्कर्ष काय?
लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले. काही जणांना तापही आला. झायकोव्ह-डी लस घेतल्यानंतर मात्र मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. लस घेतल्यानंतर थंडी वाजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात परंतु झायकोव्ह-डी लस टोचल्यानंतर मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. लस टोचल्यानंतर होणाऱ्या वेदना वगळता मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाही.
झायकोव्ह-डीविषयी
झायकोव्ह-डी ही कोरोनाप्रतिबंधक लस झायडस कॅडिला या कंपनीतर्फे तयार करण्यात आली आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठीही लस असून तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.
चाचण्या किती जणांवर?
झायकोव्ह-डी लसीच्या चाचण्या देशभरात ५० ठिकाणी १६०० मुलांवर करण्यात येत आहेत. या १६०० मुलांमध्ये सर्व स्तरातील मुलांचा समावेश आहे. वार्षिक २ लाख ते ७० लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील मुलांवर झायकोव्ह-डीच्या चाचण्या करण्यात येत आहेत.