CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:39 PM2021-05-26T15:39:54+5:302021-05-26T15:40:21+5:30

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे.

Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost | CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना विरोधातील लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. आता देशात 18 वर्षांवरील लोकांनाही लस देण्यात येत आहे. आपन लस घेतली असेल तर आपल्याला माहितच असेल, की लस घेतल्यानंतर सरकार प्रत्येक व्यक्तीला एक व्हॅक्सीन सर्टिफिकेट देत आहे. हे सर्टिफिकेट आपण सोशल मीडियावर शेअर केले असेल, तर आपल्याला सावधान व्हावे लागेल. कारण यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. (CoronaVirus Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost)

Cyber Dost नं ट्विट करत लोकांना केलं सावध -
सरकारने (Cyber Dost) ट्विट करत लोकांना कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट ऑनलाइन शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. असा इशारा देण्यामागे एक मोठे कारण आहे. खरेतर, व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटमध्ये नाव, वय आणि लिंग तसेच पुढील डोसच्या तारखेसह विविध प्रकारची माहिती असते. पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे, की या माहितीचा उपयोग बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीसाठीही केला जाऊ शकतो. यामुळे आपल्याला यापासून सावध रहायला हवे.

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ट्विटमध्य शेअर करण्यात आलेल्या फोटोत लिहिण्यात आले आहे, की 'Covid-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटमध्ये व्यक्तीचे नाव आणि इतर खासगी माहिती असते. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपले व्हॅक्सीन सर्टिफिकेट शेअर करू नये. कारण सायबर गुन्हेगार आपल्याला धोका देण्यासाठी याचा वापर करू शकतात.'

म्हणून जारी केले जाते सर्टिफिकेट -
पहिल्या डोसनंतर सरकार एक प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जारी करते. यात खासगी माहितीसोबतच दुसऱ्या डोसचीही तारीख असते. तर फायनल सर्टिफिकेट दुसरा डोस घेतल्यानंतर दिले जाते. हे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट भविष्यात इंटरनॅशनल ट्रॅव्हलसह अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकते. हे सर्टिफिकेट ऑनलाईन आरोग्य सेतू अॅप अथवा CoWin पोर्टलवरूनही डाउनलोड केले जाऊ शकते.

Read in English

Web Title: Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.