CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:16 AM2021-06-05T09:16:55+5:302021-06-05T09:19:05+5:30

लशीचा सकारात्मक परिणाम पाहता भारत सरकारने 30 कोटी डोसची प्रीबुकिंगदेखील केली आहे. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत.

Corona Vaccine Bio E Corbevax may be first india cheapest vaccine at rs 250 per dose | CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

Next

नवी दिल्ली - 'बायोलॉजिकल ई'ची लस 'कॉर्बेव्हॅक्स'ला (Corbevax) मंजुरी मिळाल्यास ती देशात उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त करोना लस असू शकते. TOIच्या वृत्तानुसार, कॉर्बेव्हॅक्सच्या दोन डोसची किंमत 400 रुपयांपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. बायोलॉजिकल ई च्या मॅनेजिंग डायरेक्टर महिमा दतला (Mahima Datla) यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात संकेत दिले. मात्र, अद्याप या लशीची किंमत निश्चित झालेली नाही.

SII च्या कोविशील्ड लशीची किंमत राज्य सरकारसाठी 300 रुपये प्रति डोज तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रती डोस एवढी आहे. भारत बायोटेकच्या लशीच्या एका डोसची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये एवढी आहे. तर डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीजने रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीची किंमत 995 रुपये प्रति डोस एवढी निश्चित केली आहे. ही लस केवळ राज्य आणि खासगी रुग्णालयांनाच मिळेल. कॉर्बेव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल सुरू आहे आणि याचे परिणाम सकारात्मक आहेत.

CoronaVirus : शाब्बास सूनबाई! 75 वर्षांच्या सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर बसवून गाठलं रुग्णालय! 

30 कोटी डोसची प्री बुकिंग -
लशीचा सकारात्मक परिणाम पाहता भारत सरकारने 30 कोटी डोसची प्रीबुकिंगदेखील केली आहे. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत. कॉर्बेव्हॅक्सची किंमत निर्धारीत करण्याच्या धोरणाचा सर्वात पहिला संकेत टेक्सासच्या बॉयलर कॉलेज ऑफ मेडिसिन (बीसीएम)मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन (एनएसटीएम) च्या असोसिएट डीन डॉ. मारिया एलेना बोटाजी यांनी दिला होता. त्यांनी म्हटले होते, की हेपेटायटीस-बीची लस आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून केवळ 1.5 डॉलर (साधारणपणे 110 रुपये) प्रति डोस प्रमाणे याचे उत्पादन केले जाऊ शकते.

CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!

ऑगस्टपर्यंत मिळू शकते EUA -
बायोलॉजिकल ई, रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (आरबीडी) प्रोटीन लशीसाठी बीसीएमसोबत सहकार्य करत आहे. खरे तर बायोलॉजिकल ईने गेल्या दोन महिन्यांत लशीचे प्रोडक्शन सुरू केले आहे. यासंदर्भात बोलताना दतला यांनी विश्वास व्यक्त केला, की ऑगस्ट महिन्यात 75 ते 80 मिलियन डोस तयार करण्याची कंपनीची क्षमता झालेली असेल. लशीला जुलै-ऑगस्टपर्यंत EUA मिळाल्यास लशीची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी केली जाऊ शकते.

Web Title: Corona Vaccine Bio E Corbevax may be first india cheapest vaccine at rs 250 per dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.