Corona Vaccine : अरे व्वा! आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांनाही लवकरच मिळणार कोरोना लस, Covovax ची ट्रायल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:59 AM2022-02-23T10:59:54+5:302022-02-23T11:16:04+5:30
Children of 2 to 6 years will get corona vaccine : आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं ठरली आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,12,622 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस (Corona Vaccine) दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं ठरली आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Seram Institute of India) विकसित केलेली कोवोवॅक्स ट्रायल दरम्यान 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना देण्यात आली.
या मुलांना Covovax चा पहिला डोस मिळाला आहे. आता दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल. देशाच्या विविध भागांतील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायलदरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान 230 सर्वात लहान मुलांना ही लस देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे. फेज 2 आणि फेज 3 मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायल ऑगस्टमध्ये सुरू झाल्या होत्या. या ट्रायलमध्ये एकूण 920 मुले सहभागी होत आहेत.
230 बालकांचा समावेश
12 ते 17 वयोगटातील 460 मुले, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 230 मुले आणि 2 ते 6 वर्षे वयोगटातील 230 बालकांचा यामध्ये समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त, भारत बायोटेक, दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांवरही कोवॅक्सिनची ट्रायल करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम किशोरवयीन मुलांवर कोवोवॅक्सची ट्रायल घेण्याच्या मंजुरीसाठी औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायल घेण्यास मान्यता देण्यात आली. जेव्हा त्यांना किशोरवयीन मुलांवरील सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खात्री होती. त्यानंतर आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर याची ट्रायल केली जात आहे.
2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू
किशोरवयीन मुलांवरील ट्रायलच्या सर्व पॅरामीटर्सवर सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूटने 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही प्रथम किशोरवयीन मुलांवर याची ट्रायल केली. त्यानंतर 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल करण्यात आली आणि आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल केली जात आहे. या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. Covovax Nanoparticle NVX-CoV2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावाने ओळखलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.