Corona vaccine : चीनने भारतीय कोरोना लसीला केले लक्ष्य, व्हॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा केला प्रयत्न

By बाळकृष्ण परब | Published: March 2, 2021 08:50 AM2021-03-02T08:50:55+5:302021-03-02T08:52:44+5:30

China targets Indian corona vaccine : भारतात विकसित आणि उत्पादित झालेल्या लसींना जागतिक पातळीवरून मोठी मागणी येऊ लागल्याने कोरोनावरील लसी उत्पादित करणाऱ्या भारतीय कंपन्या ह्या चिनी हॅकर्सच्या (Chinese hackers) निशाण्यावर आल्या आहेत.

Corona vaccine: China targets Indian corona vaccine, attempts to steal vaccine formula | Corona vaccine : चीनने भारतीय कोरोना लसीला केले लक्ष्य, व्हॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा केला प्रयत्न

Corona vaccine : चीनने भारतीय कोरोना लसीला केले लक्ष्य, व्हॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा केला प्रयत्न

Next
ठळक मुद्देचीन समर्थित हॅकर्सच्या एका गटाने हल्लीच्या काळात कोरोना लस बनवणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या आयटी सिस्टिमला केले लक्ष्य भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया म्हणजेच SII यांचा समावेश आहे. हॅकर्सनी या कंपन्यांच्या आयटी सिक्युरिटीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भारतातील कोरोना लसीची सप्लाय चेन बाधित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला

बीजिंग - वर्षभर कोरोनाचा प्रकोप झेलणाऱ्या भारताने कोरोनाच्या लसीचे उत्पादन आणि लसीकरणामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. (Indian Corona Vaccine ) भारतात विकसित आणि उत्पादित झालेल्या लसींना जागतिक पातळीवरून मोठी मागणी येऊ लागल्याने कोरोनावरील लसी उत्पादित करणाऱ्या भारतीय कंपन्या ह्या चिनी हॅकर्सच्या (Chinese hackers) निशाण्यावर आल्या आहेत. भारतात सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली असतानाच भारतीय लसनिर्मात्यांच्या आयटी सिस्टिमला हॅकर्सनी टार्गेट केले आहे. लसनिर्मात्यांची आयटी सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न झाला. हॅकिंगचा हा प्रयत्न चीन समर्थित हॅकर्सच्या एका गटाने केला होता.  (China targets Indian corona vaccine, attempts to steal vaccine formula)

रॉयटर्सने सायबर इंटेलिजन्स फर्म Cyfirma च्या हवाल्याने सांगितले की, ज्या दोन लस निर्मात्यांच्या आयटी सिस्टिमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. या कंपनीच्या लसीचे डोस देशातील लसीकरण अभियानामध्ये करण्यात येत आहे. या हॅकिंगचा हेतू भारतातील कोरोना लसीच्या सप्लाय चेनला खंडीत करण्याचा होता. 

मिळत असलेल्या माहितीनुसार चीन समर्थित हॅकर्सच्या एका गटाने हल्लीच्या काळात कोरोना लस बनवणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या आयटी सिस्टिमला लक्ष्य केले. यामध्ये भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया म्हणजेच SII यांचा समावेश आहे. हॅकर्सनी या कंपन्यांच्या आयटी सिक्युरिटीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. 

सिंगापूर आणि टोकियोमध्ये स्थित असलेली सायबर इंटेलिजन्स फर्म Cyfirma ने सांगितले की, चिनी हॅकर्स APT10 ज्याला स्टोन पांडा च्या नावाने ओळखले जाते. या हॅकर्सनी SII चे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअरच्या कमकुवत बाजूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सीरम इन्स्टिट्युट जगभरातील अनेक देशांसाठी कोरोना लसीची निर्मिती करत आहे. 

भारत आणि चीन जगभरातील अनेक देशांना कोरोनावरील लस उपलब्ध करून देत आहेत. त्यातही भारत जगभरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या लसींपैकी ६० टक्क्यांहून अधिक लसींची निर्मिती करतो. अशा परिस्थितीत भारतातील कोरोना लसीची सप्लाय चेन बाधित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला.  

Web Title: Corona vaccine: China targets Indian corona vaccine, attempts to steal vaccine formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.