Corona Vaccine: कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिक्सिंग डोसची चाचणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:31 AM2021-07-31T08:31:19+5:302021-07-31T08:31:51+5:30

Corona Vaccination Update: सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने कोविड- १९ साठी बनवलेल्या तज्ज्ञ समितीने गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मिक्स करून त्यावर अभ्यास करण्याची शिफारस केली आहे.

Corona Vaccine: Covishield and Covacin Mixing Dosage Test? | Corona Vaccine: कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिक्सिंग डोसची चाचणी?

Corona Vaccine: कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिक्सिंग डोसची चाचणी?

Next

नवी दिल्ली : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने कोविड- १९ साठी बनवलेल्या तज्ज्ञ समितीने गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मिक्स करून त्यावर अभ्यास करण्याची शिफारस केली आहे. त्यासोबत तज्ज्ञांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि नेजल व्हॅक्सिन यांचेही संयुक्त मिश्रण करण्याची शिफारस केली आहे. बायोलॉजिकल ईच्या लहान मुलांवरील लसीच्या क्लिनिकल चाचणीला परवानगी देण्याची शिफारस केली आहे. परंतु, अखेर निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया घेणार आहे.
तामिळनाडूच्या वेल्लोरस्थित क्रिश्चियन मेडिकल कॉलेजने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिक्सिंग डोसचा अभ्यास करण्यासाठी अर्ज दिला होता. यावर तज्ज्ञ समितीने क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला हा अभ्यास करण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारस केली आहे. स्थानिक वृत्तानुसार, तज्ज्ञांनी सीएमसीला फेज चारच्या क्लिनिकल चाचणीला मान्यता मिळावी, अशी शिफारस केली आहे. ज्यात ३०० लोकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येतील. यावर अभ्यास सुरू आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक कोरोनाच्या नेजल लसीवरही काम करत आहे. तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि नेजल व्हॅक्सिनच्या मिक्सिंगसाठीही शिफारस मागितली आहे.

Web Title: Corona Vaccine: Covishield and Covacin Mixing Dosage Test?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.