Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:01 AM2021-05-29T06:01:42+5:302021-05-29T06:02:19+5:30

Corona Vaccine Update: कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे.  सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला  जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल.

Corona Vaccine: Daydream of 11 crore doses of Covaxin per month | Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली :   महाराष्ट्र, गुजरातसह अन्य राज्ये आणि केंद्र सरकारभारत बायोटेक लिमिटेड कंपनीला   कोवॅक्सिन लसीचे उत्पादन महिन्याला ११ कोटी डोसपर्यंत  वाढविण्यासाठी निधी देत आहे. कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे.  सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला  जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल.

केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांना सहाय्यक अनुदान देत आहे. यात मुंबईस्थित हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशन (एचबीसी), एनडीडीबीची इंडियन इम्युनॉलॉजिलकल्स आणि बुलंदशहर येथील भारत इम्युनॉलिजिकल्स ॲण्ड बायोलॉजिकल्स कंपनी लिमिटेडचा (बीआयबीसीओएल) समावेश आहे.

हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशनला (एचबीसी) केंद्र सरकारने  ६५ कोटी रुपयांचे अनुदान दिले असून, महाराष्ट्रही ९५ कोटी रुपये गुंतविणार असल्याने  एचबीसी  प्रतिमहा २ कोटी डोसचे उत्पादन करील. तथापि, ही बंद कपनी कार्यान्वित होण्यास दीर्घकाळ लागेल.

इंडियन इम्युनॉलॉजिलकल्सची क्षमता वाढविण्यसाठी एनडीडीबी हातभार लावीत आहे. ही कंपनी बीआयबीसीओएलसोबत दरमहा १ ते १.२० कोटी डोसचे उत्पादन करील. केंद्र सरकारने बीआयबीसीओएलला ३० कोटी रुपये दिले असून, या कंपनीने अद्याप नवीन प्रयोगशाळा स्थापन केलेली नाही. परंतु, या कंपनीची ही  सर्व  उत्पादन प्रक्रिया ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्येच सुरू होईल.  तसेच  भारत बायोटेक कंपनीकडून या कंपनीला तंत्रशास्त्र  देण्याची प्रक्रिया चालू आहे.  ही कंपनी पोलिओ लसीचे उत्पादन करते.

भारत बायोटेक लिमिटेड स्वत:चे सयंत्र स्थापन करणार असून, नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत ती कार्यान्वित होतील. यात २ दशलक्ष डोसचे उत्पादन होईल आणि उत्पादन क्षमता ५ ते ६ दशलक्ष डोसने  वाढविले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. 

गुजरातेत दरवर्षी २० कोटी डोस : गुजरातस्थित हेस्टर बायोसायन्सेन कंपनीने गुंतवणुकीसह  कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी  गुजरात सरकारशी समझोता केला आहे. भारत बायोटेक कंपनी गुजरातमधील अंकलेश्वर येथील  शिरॉन बेहरिंग या कंपनीत वर्षाकाठी २० डोसचे उत्पादन करणार आहे. सीरम प्रतिमहा कोविशिल्डचा ७ कोटी डोसचा पुरवठा करीत असून, जुलैपर्यंत ११ कोटीने वाढविणार आहे.

Web Title: Corona Vaccine: Daydream of 11 crore doses of Covaxin per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.